बुलढाणा, 12 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शीत झालेला ट्वेल्थ फेल हा चित्रपट अनेकांना प्रेरणा देवून गेला होता. आयपीएस मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारीत सत्यकथेवर निर्माण झालेल्या या चित्रपटाची संक्षीप्त कथा म्हणजे गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मनोजच्या वडिलांची नोकरी जाते. नोकरी जाण्यामागचं कारण त्यांचा प्रामाणिकपणा असतं. अशातच मनोज बारावीत नापास होतो. शाळेत असलेल्या प्रामाणिक पोलीस अधिकार्यामुळे मनोजला कॉपी करता आलेलं नसतं. त्यामुळे मनोजलादेखील त्या अधिकार्यासारखं होण्याची इच्छा असते. त्यावेळी ती अधिकारी त्याला सांगतो की, तुला माझ्यसारखं व्हायचं असेल तर तुला चीटिंग करणं थांबवावं लागेल… बुलढाण्यात कॉपीमुक्त अभियान राबवितांना सीईओ विशाल नरवाडे यांनी त्यावेळी या चित्रपटाचा उल्लेख करीत म्हटले होते की, चुकीच्या मार्गाने यश मिळू शकत नाही.. प्रामाणिक राहून परिश्रम घ्यावे लागतील.. आमच्यासारखे आयएएस, आयपीएस व्हायचे असेल तर गैरमार्गाचा अवलंब करून शक्य नाही.. म्हणून ट्वेल्थ फेल चित्रपटात जसं मनोज शर्मा म्हणतो की, ‘चिटींग को रोकना होगा’, तसंच काम करावे लागेल.. कॉपीमुक्त अभियान राबवावे लागेल..,. सीईओ विशाल नरवाडे यांनी सुरु केलेली ही शैक्षणिक क्रांती आता व्यापक स्वरूप धारण करीत असून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी कॉपीमुक्तीचा ‘विशाल नरवाडे पॅटर्न’ राबविण्याची नुकतीच घोषणा केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉपीला मदत करणार्या कर्मचार्यांना सरळ बडतर्फ करण्याचा इशारा देवून कॉपीमुक्त अभियानासाठी राज्य शासन गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे.
बुलढाण्याचे भुमिपुत्र आणि बुलढाणा जि.प. माजी मुख्य कार्यकारी आधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगली, कळवण (नाशिक) व बुलढाणा या ठिकाणी तत्रंज्ञनाच्या सहाय्याने कॉपीमुक्त अभियान राबविले होते. त्याची दखल घेत आता कॉपमुक्तीचा ‘विशाल नरवाडे पॅटर्न’ आता राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दखल घेत ते राज्यभर राबविण्याचे आदेश दिले आहे. प्रत्येक परिक्षा केंद्र हे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयी जोडला जाईल. तो मोबाईल खोलीतील सर्व विद्यार्थी दिसतील, अशा ठिकाणी ठेवून ऑनलाईन रेकॉर्डींग केली जाईल. कुठेही थोडीही गडबड दिसली की संबंधीत केंद्रावर ‘फ्लाईंग स्न्वॅड’ची धाड टाकण्यात येईल.
मागील वर्षी 2024 मध्ये विशाल नरवाडे यांची जिल्हा परिषद बुलडाणा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात प्रथमच, जिल्हा प्रशासनाने बारावी आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अभिनव कॉपीमुक्ती अभियान राबवले होते. कॉपी मुक्त अभियान चा विशाल नरवाडे पॅटर्न राज्यभर राबविण्याचे मुख्य सचिवांचा आदेश 12 वी आणि 10 वीच्या बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाल्या असून त्या 17 मार्चपर्यंत राज्यभर चालणार आहेत. दरवर्षी, बहुतांश ठिकाणी राज्यभर परीक्षेदरम्यान गैरमार्गाने कॉपी करणे सर्वत्र कमी जास्त प्रमाणात दिसून येते.
या संदर्भात ‘कॉपीमुक्त परीक्षा’ घेणे प्रशासनासमोर नेहमीच आव्हान असते. परीक्षेशी संबंधित कॉपीच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी महसूल पथक, पोलिस पथक, बैठे पथक, भरारी पथके अशी यंत्रणा सध्या कार्यरत आहे. परंतु, परीक्षा एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असल्याने प्रत्येक परीक्षेच्या पेपरच्या प्रत्येक दिवशी सर्व विभागांचे इतके मनुष्यबळ उपलब्ध करून देणे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले आहे.
या संदर्भात, 2020 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे आय.ए.एस. अधिकारी विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन मॉडेल तयार केले आहे. यासाठी मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीला राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे सचिव, शिक्षण आयुक्त, परीक्षा मंडळाचे संचालक उपस्थित होते. क्षेत्रस्तरीय अधिकार्यांकडून सूचना आणि सर्वोत्तम पद्धती विचारल्या गेल्या. त्यानुसार मुख्य सचिवांनी तंत्रज्ञानाच्या वापराचे कौतुक करत यंदाच्या वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशाल नरवाडे’ पॅटर्न राज्यभर राबविण्याचे आदेश दिले.
काय आहे कॉपीमुक्त परिक्षा अभियानाचा विशाल नरवाडे पॅटर्न
या मॉडेलमध्ये झूम तंत्रज्ञानाचा प्लॅटफॉर्म ऑडिओ-व्हिडिओ मोडमध्ये वापरला जातो. जिल्हा स्तरावर, केंद्रीकृत झूम बैठक तयार केली जाते. ती लिंक सर्व परीक्षा केंद्रांना आणि सर्व परीक्षा पर्यवेक्षकांना पाठवले जाते. प्रत्येक पर्यवेक्षकाने त्यांच्या मोबाईलवरून कॅमेरा चालू ठेवून या मीटिंगमध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे. परीक्षा लिहिणार्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मोबाईल सायलेंट आणि म्यूट ठेवण्यात येतात.
मोबाईल अशा ठिकाणी वर्गात स्थिर ठेवलेले असतात जेणेकरून त्या परीक्षा कक्षात, परीक्षा लिहिणारे सर्व 25 विद्यार्थी दिसावेत. अशा प्रकारे, सर्व परीक्षा केंद्रे आणि सर्व परीक्षा केंद्रांमधील सर्व ब्लॉक/वर्ग लाइव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडमध्ये कव्हर केले जातात.
परीक्षा-संदर्भात कोणीही कॉपी करतांना आढळल्यास, जिल्हास्तरीय होस्ट अनम्यूट करतात आणि संपूर्ण जिल्ह्याला ऐकू येतील अशा सूचना देतात. अशा प्रकारे, सर्व परीक्षा पर्यवेक्षकांवर प्रभावी पर्यवेक्षण सुनिश्चित केले जाते.
विशाल नरवाडे पॅटर्नच्या या अभिनव मॉडेलचे फायदे:-*
1. परीक्षा आयोजित करताना 100% पारदर्शकता सुनिश्चित केली जाते
2. कोणत्याही अतिरिक्त प्रशासकीय मनुष्यबळाची गरज नाही, कारण आधीच विद्यमान परीक्षा पर्यवेक्षकांना जबाबदारी देण्यात येते.
3. कोणत्याही अतिरिक्त सरकारी खर्चाची आवश्यकता नाही. यात कोणत्याही खर्चाचा समावेश नाही.
4. प्रशासनासाठी देखील देखरेख करणे सोपे आहे
5. पोलीस पथक, महसूल पथक, शिक्षण पथक यांच्या जबाबदार्या कमी झाल्या
6. परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन आणि त्यामुळे प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करण्यास प्रवृत्त होतात
7. इतर कोणत्याही परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रतिकृती/अबलंबण तयार करणे सोपे आहे.