◾ लहान मुलीच्या विनयभंगप्रकरणी पोक्सो दाखल
बुलढाणा, 17 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : आई-वडील कुठे आहे? असे विचारत घरात घुसलेल्या मलकापूरच्या सुनील बुरड याने 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. बुरडने हे कुकृत्य बुलढाणा तालुक्यातील बोरखेड गावात आज सकाळी केले. बुरडविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूरचा इस्टेट ब्रोकर सुनील बुरड (वय 63) याने बोरखेडमध्ये गैरव्यवहारातून शेती घेतलेली आहे. या व्यवहारांना सावकारकीची काळी किनार असल्याचे सूत्रांकडून कळते. आज, हा थेरडा बोरखेडमध्ये पोहोचला. ज्याच्याशी व्यवहार आहे, त्याच्या घरी जेव्हा बुरड पोहोचला तेव्हा घरात एक 12 वर्षीय मुलीशिवाय कुणी नव्हते. बुरडने मुलीला तिचे आईवडील कुठे आहे, अशी विचारणा केली. आणि दुसऱ्याच क्षणी तिला जवळ ओढून त्या मुलीची छाती दाबली. पिडीत मुली प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यामुळे आरोपी सुनील बुरड लगेच बाहेर आला आणि मोटरसायकल घेऊन तिथून निघून गेला. पीडित मुलीने सदर घटना आपली आजी आणि वडील यांना सांगितले. त्यानंतर सदर परिवाराने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात सदर घटनेबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्या विरोधात अपराध क्रमांक 221/2025, भारतीय न्यायसंहितेची कलम 74, 333, सर कलम 8, 12 एक्स नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदार श्री कांबळे यांच्या मार्गदर्शनामध्ये पीएसआय गोकुळसिंग राठोड प्रकरणाचा तपास करीत आहे.
*तारापूरमध्ये बूरडला चोप*
सदर घटना संताप आणणारी होती. गावामध्ये बुरडचे निंदनीय कृत्य पसरताच त्याचा शोध सुरु झाला. त्याला गावकऱ्यांनी तारापूरमध्ये गाठले. तो दिसताच महिलांनी त्याला चपलेने बदडले. त्यावेळी तो गयावया करताना दिसला. बुरड याच्या सावकारकी विरोधातही गावात प्रचंड रोष असल्याचे कळते. गावातील काही जणांकडून बुरडने जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आपल्याला मारहाण करणार्यांविरोधात बुरडने तक्रार दिलेली आहे.