spot_img

विश्वास नगरात चोरीचा घात ; सेवानिवृत्त पोलिसासह दोन घरफोड्या

बुलढाणा, 18 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली रोडवरील हाजी मलंग दर्गाहच्या विरूद्ध दिशेला स्थित विश्वास नगरमध्ये मध्यरात्रीनंतर दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. खळबळजनक बाब म्हणजे यातील एक सेवानिवृत्त पोलिसाचे घर आहे. दोन्ही घरे बंद होती. पाच जणांच्या टोळक्याने घरफोडी करून पैसे आणि दागिने लूटले. सर्व चोर सिसिटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पण मागील 25 वर्षात विश्वास नगरमध्ये कधी घरफोडी झालेली नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. विश्वास नगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी सुनिल हिवाळे यांचे दुमजली घर आहे. तळमजल्यावर ते राहतात आणि वरच्या माळ्यावर भाडेकरू राहतात. हिवाळे मागील अनेक महिन्यांपासून पुण्याला स्थलांतरीत झालेले आहे. अधून-मधून ते येत राहतात परंतु घर एरव्ही बंदच असते. तर बाजूलाच गजानन पाटील यांचे घर आहे. हिवाळे आणि पाटील दोन ठिकाणी चोरांनी घरफोडी केली. यातील पाटील यांच्या घरून चोरांना रिकामे परतावे लागले. परंतु हिवाळे यांच्या घरून माल चोरून बाहेर पडतांना चोरटे सिसिटीव्हीमध्ये दिसत आहेत. भिंतीवरून दोन जण आत आले. नंतर त्यांनी आतून चॅनल गेट तोडले. मग उर्वरीत तीघे जण आत आले. पाचही जणांनी मिळून घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि 10 मिनीटांमध्ये घरातून कॅश आणि दागिने घेवून बाहेर पडले. पहाटे 3.30 वाजेदरम्यान झालेली ही घरफोडी सिसिटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. श्री हिवाळे यांच्याशी गुड इव्हिनिंग सिटीने संपर्क साधला असता ते पुण्यात होते. त्यांनी सांगितले की, बुलढाण्यात पोहोचल्यानंतरच किती रूपयांची चोरी झाली, हे सांगता येईल. बुलढाणा शहर पोलिसांना माहिती मिळताच एक पथक घटनस्थळी पोहोचले होते. सदर सिसिटीव्ही फूटेज गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त झाले असून आमच्या वाचकांसाठी आम्ही ते देत आहोत. यातील कुणी ओळखीचे असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून पोलिसांना तपासात सहकार्य होऊ शकेल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत