बुलढाणा, 18 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः राजूर घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे तर दोन जखमी झाले आहे. मारूती ईको कंपनीची एमएच 37 एएच 3099 क्रमाकांची गाडी बुलढाण्यावरून जात होती. तर मोहेगाव येथील रतीलाल राठोड हे बुलढाण्याकडे एका कामानिमित्त येत होते. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास राजूर घाटातील हानुमान मंदीराजवळ मारूती ईको आणि दुचाकी यामध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये मारूती ईको गाडी खाली दुचाकी दबली. अपघातात रतीलाल राठोड रा.मोहेगाव यांचा मृत्यू झाला. तर मारूती ईको गाडीमधील शिव प्रसाद, निकिता प्रसाद बुलढाणा हे जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थाळावर बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस दाखल झाले आहे.





Total Users : 1356658