spot_img

राजा उदार झाला, हाती भोपळा दिला !

शेतकर्‍यांना ५ हजाराच्या मदतीवरून राष्ट्रवादीचे ‘भोपळा आंदोलन’

बुलढाणा, १९ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शासनाने महाराष्ट्रत भीषण दुष्काळ जाहीर केला. दुष्काळाची हेक्टरी १ लाख रुपये मदत शासन जाहीर करेल अशी अपेक्षा होती, परंतु शासनाने मात्र शेतकर्‍याला दिवाळी साजरी करण्यासाठी पाच हजार रुपये मदत जाहीर केली. ही कृती म्हणजे राजा उदार झाला आणि पदरी भोपळा असू शेतकर्‍यांच्या हाती भोपळा देऊन त्याला भिकार्‍याच्या लाईनीत बसविण्याचा प्रकार आहे. दिवाळी साजरा करण्यासाठी पाच हजार रुपये मदत जाहीर करणे म्हणजे शेतकर्‍याची थट्टा आहे’, असे मत व्यक्त करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या नेतृत्वात  आज, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोपळा आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान भोपळे फोडण्यात आले.
पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यामार्ङ्गत पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले की, शासनाने महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे.दुष्काळाने शेतकरी पूर्णतः उध्वस्त झालेला असताना या संकटातून सावरण्यासाठी किमान १ लाख रुपये हेक्टरी मदत शासनाकडून देणे अपेक्षित होते . शासनाने ङ्गक्त दुष्काळ जाहीर केला आणि दिवाळी साजरी करण्यासाठी ५ हजार रुपये मदत जाहीर केली ,हा प्रकार म्हणजे बळीराजाला अपमानित करण्याचा प्रकार आहे.या बाबीचा आम्ही शासनाचा निषेध करीत आहोत. शासनाने बळीराजापती घेतलेल्या या अपमान कारक धोरणाचा निषेध करण्यासाठी प्रतीकात्मक भोपळा आंदोलन करीत आहोत जेणेकरून शासनाने आपल्या निर्णयाचा ङ्गेर विचार करून तत्काळ हेक्टरी १ लाख रुपये दुष्काळग्रस्त म्हणून मदत द्यावी. शिवाय पिक विमा तत्काळ मंजूर करून शेतकर्‍यांच्या खात्यात टाकावा. अन्यथा आम्हाला यापेक्षाही तीव्र आंदोलन बळीराजासाठी करावे लागेल व याची सर्व जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शेळके यांच्यासह प्रदेश सरचिटणीस बीटी जाधव, युवक जिल्हाध्यक्ष सतीश भुतेकर, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे, माजी सभापती लक्षमी ताई शेळके, महिला राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य नाझीमाताई खान, चिखली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ.ज्योतीताई खेडेकर, बुलढाणा विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ.शरद काळे ,पीएम जाधव, ह भ प शंकर महाराज, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सईद इकबाल, सेवादाल जिल्हाध्यक्ष सुरेश बोंद्रे, जिल्हा प्रवक्ता अमोल भट, ओबीसी जिल्हाध्यक्ष गजानन भिवसनकर, तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे, बाळासाहेब पवार, सुनील कोल्हे, शहराध्यक्ष अनिल वर्मा ,रवींद्र तोडकर ,महादेवराव शेळके ,विजय कळवाघे, संजय शिरसाट, गणेश कोरके, नसीम शेठ, कबीर भाई, जाकीर कुरेशी ,राजेश गवई, हरी साठे, विठ्ठलराव मोरे ,विशाल पाटील,  एड. प्रकाश गायकवाड, एड. पांडुरंग नरोटे, एड.संजय नागरे ,श्रीकृष्ण डुकरे, डॉ.विकास मिसाळ, डॉ.भगवानराव देठे, शेषराव कानडजे, अक्षय सुरोशे, देवानंद कुलसुंदर, किरण कांबळे, गणपतराव कुसळकर, विष्णु पवार, संभाजीराव पवार,  संजय जवरे पाटील, ज्ञानेश्‍वर शेळके, शिवराज शेळके, प्रभाकर काळवाघे, समाधान सोनङ्गळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत