बुलढाणा, ३० मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्याचे आक्रमक आमदार संजय गायकवाड आणि रोहित पवार’ हे उद्या ३१ मे रोजी एकाच मंचावर आणि ते सुद्धा बुलढाण्यात असणार आहेत. गेल्या महिन्यात राजकीय वर्तुळात अत्यंत वादळी ठरलेल्या या दोन नावांना एकाच व्यासपीठावर आणण्याची अद्भूत किमया ‘ज्यांचा नांदच खुळा आहे’ अशा नांद ॲडव्हर्टायझिंगने साधून दाखवली आहे. त्यामुळे उद्याच्या या सोहळ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आमदार संजय गायकवाड आणि रोहितदादा पवार यांच्यात’ ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादादरम्यान रोहित पवार यांनी आमदार गायकवाड यांना थेट चॅलेंजही दिले होते. मात्र, काही कारणास्तव त्यावेळी त्यांचा बुलढाणा दौरा होऊ शकला नव्हता. त्यानंतर ७ मे रोजी जेव्हा ते बुलढाण्यात आले, तेव्हा त्यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कोणतीही टीका करणे किंवा बोलणे पूर्णपणे टाळले होते.
आमदार संजय गायकवाड आणि रोहितदादा पवार एकाच मंचावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया
उंचावल्या आहेत. मात्र तुम्ही समजता तसं काही नाही मंचावर उपस्थित राहणारे रोहित पवार हे राष्ट्रवादीचे नेते नसून, पुण्याच्या प्रसिद्ध ‘शिवाय ॲडव्हर्टायझिंग’चे सर्वेसर्वा रोहितदादा पवार हे आहेत. अंकुश पदमने यांच्या नांद ॲडव्हर्टायझिंगच्या नवीन कार्यालयाचा भव्य स्थलांतर सोहळा उद्या, रविवार ३१ मे रोजी जिजामाता व्यापारी संकुल बुलढाणा येथे पार पडत आहे. याच सोहळ्याचे औचित्य साधून नांद ॲडव्हर्टायझिंगने आमदार संजय गायकवाड आणि पुण्याच्या शिवाय ॲडव्हर्टायझिंगचे सर्वेसर्वा रोहित पवार यांना निमंत्रित केले आहे. नाव साधर्म्यामुळे आणि भूतकाळातील वादाच्या पार्श्वभूमीवर, उद्या बुलढाण्यात रंगणाऱ्या या आमदार गायकवाड आणि रोहित पवार यांच्यातील मंचावरील भेटीची आणि नांद ॲडव्हर्टायझिंगने अनोखी किमया साधली आहे.



