spot_img

ऑपेरेशन टायगर ! आ. धीरज लिंगाडे यांना 20 कोटीची ऑफर??

संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
बुलढाणा: महाविकास आघाडीला आणखी एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्याला पक्षांतरासाठी 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊत यांनी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्याबाबत हे वक्तव्य केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार धीरज लिंगाडे यांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मलाही आज सकाळी कळालं, मला प्रसारमाध्यमांनी सांगितले. संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत, त्यांनी एकदम असं वक्तव्य कसं केलं, याचं मला आश्चर्य वाटलं. परंतु, हे साफ खोटं आहे, अशी कुठलीही ऑफर मला नाही, माझ्या संदर्भात केलेला दावा खोटा आहे, असे धीरज लिंगाडे यांनी निक्षून सांगितले. मला कोणत्याही राजकीय पक्षाकडून कुठलीही ऑफर मला आली नाही व मी कुठल्याही रुग्णालयात भरती झालेलो नाही, असेही त्यांनी म्हटले.
लिंगाडे नावाचे आमदार आहेत त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर आली आहे. काल परवाची गोष्ट आहे. या आमदाराला ऑफर देण्यात आली आहे. तो आमचा आमदार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, चर्चा सुरु असतात, अमुक माणसाला ऑफर देण्यात आली आहे. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत