spot_img

दुःखाच्या वणव्यात मदतीची फुंकर..!

  सुडी जळालेल्या शेतकऱ्याच्या मदतीला धावले शिवाजीराव तायडे 

 बुलढाणा: 19ऑक्टोंबर( गुड इव्हीनींग सिटी):
“नावात काय आहे?” ही म्हण बऱ्याचदा ऐकायला मिळते, परंतु आपल्या कर्तृत्वाने नावाला सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अंभोड्याचे भुमिपुत्र शिवाजीराव तायडे. अडल्यानडल्यांना मदत करणे, शोषित, पीडित आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली करणे, तसेच कुठल्याही सामाजिक उत्सवाला सडळ हाताने मदत करणे हा शिवाजीरावांचा स्थायीभाव आहे. त्यांच्या दारातून कधीही कोणीही रिकाम्या हाताने माघारी फिरलेले नाही, याच दातृत्ववान स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. बुलढाणा तालुक्यातील हातेडी येथील शेतकरी राजेंद्र आनंद जाधव यांच्या चार एकरातील सोयाबीनची सुडी अज्ञात व्यक्तीने जाळून नष्ट केली. या सुडीमध्ये अंदाजे तीस क्विंटल सोयाबीनचे उत्पादन निघाले असते, ज्याची आजच्या बाजारभावानुसार दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत झाली असती. हातातोंडाशी आलेला घास अज्ञात समाजकंटकांनी अशा प्रकारे जाळून हिरावून घेतल्यामुळे जाधव कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. शेतकऱ्यावरील या अस्मानी व सुलतानी संकटाची माहिती मिळताच शिवाजीराव तायडे यांनी तात्काळ जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीडित शेतकरी राजेंद्र आनंद जाधव आणि विमल राजेंद्र जाधव यांच्याकडे ५१ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.
यावेळी सरपंच श्रीकांत जाधव, शिवसेना शाखा प्रमुख संदीप जाधव, शंकरराव तायडे, ज्ञानेश्वर पवार, माधवराव भुसारी, भागवतराव तायडे, विनोद तायडे, अनंता थोरात, कार्तिक राजेंद्र जाधव, पंजाबराव आनंदा जाधव, शिवाजी जाधव, अरविंद तारगे, सिद्धेश्वर दळवी, गजानन श्रीपत जाधव, निंबाजी जाधव, सुनील फौजी, राहुल कुलकर्णी, आणि शुभम जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाजीराव तायडे यांच्या या संवेदनशील आणि मदतीच्या हातामुळे एका संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत