spot_img

घरकुलच्या अनुदानासाठी लाच घेणे भोवले ; अभियंता सचिन इंगळे रंगेहाथ पकडला

बुलढाणा, १५ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः घरकुलच्या दूसर्‍या टप्प्यातील अनुदानासाठी दहा हजार रूपयांची लाच घेतांना ग्रामिण गृहनिर्माण अभियंता सचिन इंगळेला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. थोड्या वेळापूर्वी झालेल्या या कारवाईनंतर मोताळा पंचायत समितीमध्ये एकच खळबळ?उडाली आहे. विशेष म्हणजे इंगळे यांना आपल्या गावापासून तीन किलोमिटर अंतरवर लोकसेवकाला लाच घेवून बोलाविले होते. २९ वर्षीय सचिन इंगळे हा ग्राम कंडारी, ता. खामगांव येथे निवासाला आहे. संबंधीत व्यक्तीला घरकुलाच्या दूसर्‍या टप्प्याचे अनुदान वितरीत करण्यासाठी इंगळे याने दहा हजार रूपयांची लाच मागितली होती. परंतु लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे संबंधीताने ऍन्टी करप्शन ब्यूरोच्या बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधला होता. लाचेबाबतची पडताळणी मोताळा पंचायत समितीकडून झाल्यानंतरर एसीबीच्या पथकाने आज इंगळे भोवती ट्रॅप रचला. पकडले जावू नये म्हणून इंगळेने संबंधीताला आपल्या गावापासून तीन किलोमिटर अंतरावर बोलाविले. परंतु तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्याला दहा हजार रूपये नकदी स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक श्री चोरमाले यांच्या नेतृत्वात सदर कारवाई यशस्वी झाली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत