येत्या शनिवारी २ मे,२०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गोवर्धन सभागृह, बुलडाणा येथे सदर काव्यमैफिल आयोजित आहे. सर्व रसिकांसाठी खुली मेजवाणी ठरणाऱ्या ह्या काव्य मैफिलीमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचा सहभाग असून त्यामध्ये प्रशांतदादा मोरे (कल्याण), संदीप जगताप (नाशिक), सौ. रत्नमाला शिंदे-सोनवणे (जळगाव) आणि विशाल मोहिते (बुलडाणा) यांचेसह
गोपाल मापारी (अकोला) हे त्यांच्या रंगतदार निवेदन शैलीमुळे मैफिलीत रंग भरणार आहेत.
सदर काव्य मैफिलीसाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक बुलडाणा अर्बन परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.





Total Users : 1430325