spot_img

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश अवचार (पाटील)

बुलढाणा, 20 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होम टाऊन असलेल्या बुलढाण्याचा जिल्हाध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राहुल बोंद्रे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदी कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.‌ उबाठातून काँग्रेसमध्ये आलेल्या संदिप शेळके यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी दाट शक्यता होती. त्या दृष्टीने संदीप शेळके यांनी दौरा सुध्दा केला. परंतु आज जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा दिली आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकात ते कशाप्रकारे कामगिरी करतात ते बघावे लागेल. काँग्रेसला‌ घाटावर आणि घाटाखाली गतवैभव प्राप्त करायचे असेल तर पायला भिंगरी लावून फिरावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यात विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे सोडले तर काँग्रेसकडे आता आमदारच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता प्रकाश पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

@goodeveningcity
20 may2026. 11:15
◾◾◾◾

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत