spot_img

बुलढाण्याचा सुपुत्र सागर उज्जैनकर यूपीएससी उत्तीर्ण

◾ जिल्हा युवा अधिकारी म्हणून निवड
बुलढाणा, 2 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : एमपीएससी प्रमाणेच यूपीएससीतही बुलढाणा जिल्ह्यातील मुले मुली यशस्वी कामगिरी करीत असून बुलढाण्याचा सुपुत्र सागर रूपराव उज्जैनकर याचे नांव यूपीएससी उत्तीर्ण करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. त्याच्या या यशाने बुलढाण्याची मान उंचावली असून अनेकांसाठी तो आदर्श ठरला आहे. येथील महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष रुपराव उज्जैनकर यांचा तो सुपुत्र आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण भारत विद्यालय बुलढाणा येथे पूर्ण केल्यानंतर सागर उज्जैनकर यांनी अकरावी आणि बारावी मध्ये श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्याने नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंग इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी. टेक. ची पदवी उत्तीर्ण केली. नंतर एलएलबी होऊन सागर याने स्पर्धा परीक्षेचे क्लासेस केले. पाचव्या प्रयत्नात तो युपीएससी उत्तीर्ण झाला आहे. 2024 मध्ये त्याने परीक्षा दिली होती. त्यानंतर तो वेटिंग लिस्ट मध्ये होता. काल दुपारी त्याला जिल्हा युवा अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र मिळाले. गुड इव्हिनिंग सिटीने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील मित्रपरिवार आणि शिक्षक वर्गाला दिले आहे.

त्याच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार आनंदित आहे. आज सायंकाळी त्याचे पुणे येथून बुलढाण्यातील निवासस्थानी आगमन होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत