बुलढाणा, ८ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : राखीव वनक्षेत्रात चराई केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गणेश नगर परिसरातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरित्या मेंढी चराई होत असल्याच्या तक्रारी वन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने हनवतखेड बीट, वर्तुळ बुलढाणा, कक्ष क्रमांक ५२१ येथे छापा टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान राखीव वनक्षेत्रात अवैधरित्या मेंढी चराई सुरू असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने मेंढ्या जप्त करण्यासाठी पाठलाग केला असता संबंधित मेंढपाळांनी मेंढ्या वनक्षेत्रातून पळवून नेल्या. मात्र घटना स्थळावरून एका आरोपीस ताब्यात घेण्यात वन विभागाला यश आले.
याप्रकरणी हरिभाऊ तानाजी कोळपे वय रा. पिंपळगाव नाथ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
ही कारवाई उप वनसंरक्षक जमीर शेक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रा. व कॅम्पा बुलढाना वैभव काकडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा. बुलढाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. पथकाचे नेतृत्व वनपाल बुलढाना प्रदीप प्रकाश मुंढे यांनी केले. कारवाईमध्ये वनरक्षक जी. आर. शिंदे (हनवतखेड बीट), एस. व्ही. झोटे, एस. व्ही. शिंदे, एन. ए. गवई, जी. एम. पोटे, वनरक्षक वाहन चालक प्रवीण सोनवणे तसेच वनमजूर दीपक सोनवणे, रवींद्र तायडे व पवन मुळे यांनी सहभाग घेतला. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, राखीव वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारची अवैध चराई, अतिक्रमण अथवा वनविषयक बेकायदेशीर कृत्ये आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ वन विभागाला द्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित व प्रभावी कारवाई करता येईल.




