◼️ मोटर सायकलस्वार वैभव गणगे जागीच ठार
◼️ मागे बसलेला युवक गंभीर जखमी

बुलढाणा, 9 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा मोताळा मार्गावर असलेल्या मूर्ती फाट्यानजीक आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान एक भयंकर अपघात घडला. भरधाव मोटरसायकलने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला असून त्याच्यामागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव वैभव समाधान गणगे असून तू कोथळी येथील राहणारा असल्याचे समजते. एका लग्नानिमित्त वैभव आणि त्याचा मित्र मोटार सायकल वर (एम एच 19 बिए 1287) जात होते. मूर्ती फाट्याजवळ रसवंती नजीक मलकापूर कडे निघालेल्या बसवर ही मोटर सायकल जोरदार धडकली. काही क्षणातच मोटर सायकल चालवणारा वैभव गणगे जागेवरच गतप्राण झाला. त्याच्या डोक्याला भयंकर मार लागला होता. तर मागे बसलेला युवक राजू सुधाकर बावणे गंभीर जखमी झाला आहे. मेहकरवरून भुसावळकडे (एम एच 40 एन 9941)जाणाऱ्या या बसमधील प्रवाशांचे म्हणणे आहे की, मोटर सायकलची स्पीड जोरात होती. दरम्यान बुलढाण्याचे आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी घटनास्थळाला त्वरित भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. युवा नेते पृथ्वीराज गायकवाड यांनी सदर अपघातातील जखमी युवकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात पाठविले. बोराखेडी पोलिसांनी ही तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. अपघात स्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.
