spot_img

पं.स. अभियांत्रिकी सहाय्यक राठोड यास २ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

बुलढाणा, १६ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : नांदुरा पंचायत समितीचा अभियांत्रिकी सहाय्यक लाच घेतांना रांगेहाथ अटक करण्यात आला आहे. खेमराज राठोड २ हजाराची लाच घेतांना जाळ्यात बुलढाणा अँटी करप्शन ब्युरोने पुन्हा एकदा धडाकेबाज कार्यवाही केली आहे. आज दुपारी नांदुरा पंचायत समितीचे अभियांत्रिकी सहाय्यक खेमराज राठोड याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांचे व त्यांच्या आईचे घरकुलाचे प्रस्ताव पंचायत समीती नांदुरा येथे सादर केलेले होते. तकारदार हे त्यांच्या आईच्या घरकुलासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची चौकशी करण्याकरीता पंचायत समीती नांदुरा येथे गेले असता यातील खेमराज राठोड, पद-स्थापत्त्य अभियांत्रीकी सहायक, बांधकाम विभाग, पंचायत समीती नांदुरा हे तकारदार यांच्या घरकुलाचा प्रस्ताव पाठविल्याचा मोबदला म्हणुन २ हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार काल दिनांक १५ जुलै रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता, लोकसेवक खेमराज राठोड, स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, बांधकाम विभाग, पंचायत समीती नांदुरा यांनी तकारदार यांचेकडे २ हजार रुपये लाच मागणी करुन सदर लाच रक्कम स्विकारण्यास संमती दिली. त्यावरुन आज दिनांक १६ जुलै रोजी आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान राठोड यांना तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारतांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यावरुन आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, सापळा मदत पथक सफौ शाम भांगे, पोहेका प्रविण बैरागी, पोना विनोद लोखंडे, पोकों रंजीत व्यवहारे, चानापोकों नितीन शेटे, शेख अर्शीद अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत