spot_img

जिल्हा बँकेच्या वतीने ना. प्रतापराव जाधवांचा भव्य सत्कार

बुलढाणा, १९ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : जिल्हा केंद्रिय सहाकरी बँकेच्या वतीने ना. प्रता- पराव जाधव केंद्रिय आयुष व अरोग्य, कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.धीरज लिंगाडे, आ. संजय रायमूलकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर मंचावर उपस्थित होते. ना. जाधव यांनी सत्कार सोहळ्यात मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, राजकीय जवीनाची सुरूवात सहाकर क्षेत्रातूनच खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून झाली. सहकारातील लोकांचे मागदर्शन सतत लाभत गेले. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांची प्रगती होऊ शकते. सहकारतूनच सहाकार्य करता येते. काही अडचणी आल्या, बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. २००९ मध्ये डॉ. शिंगणे यांच्या विरोधात लोकसभेला लढलो पण २०१० ला आ.डॉ. शिंगणेंच्या सोबत सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध केली. या बँकेच्या विरोधात अनेक लोकांनी आंदोलने केली. शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करणाऱ्यासाठी कर्ज दिले होते. परंतू हे उद्योग बंद पडल्याने बँका डबघाईस आली. ४ वर्षापूर्वी ३०० कोटी बँकेला मिळावे यासाठी मागच्या सरकारकडे मदत मागतिली परंतू दिली नाही. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांनी राज्य सहकारी बँकेचा विरोध असतांना मदत केली. सर्वांनी प्रयत्न केले तर बँकेला गतवैभव प्राप्त होईल. सर्वांनी हेवेदावे विसरून शेतकऱ्यांच्या बँकेसाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याशी संबधीत काही समस्या असतील त्यांनी राजू भोर यांच्याशी ९५५२१०५७५० या संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्यासाठी केला जाईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जिल्ह्यातला भुमिपुत्र केंद्रात मंत्री झाला हे खरच बुलढाणा जिल्ह्यासाठी भुषणावह बाब आहे. ना. जाधव यांचा सत्कार आणि बँकेला ३०० कोटीच्या माध्यमातून मिळालेली नव संजवनी हा खरच दूध शर्करा योग आहे. ना. जाधव हे बुलढाण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावतील याबाबत मनात तीळ मात्र शंका नाही. आरोग्याच्याबाबतीत जे काम करायचे होते. ते ना. जाधव यांच्या माध्यमातून लावू. दहा बारा वर्षांनी जिल्हा बँकेत कुठेतरी आज कार्यक्रम होत आहे. जिल्हा बँकेला स मदत करण्यासाठी एक मायचा लाल पुढे आला नाही. सगळ्या गोष्टी पचवत बँक सुधारण्यासाठी प्रयत्न केले. ज्यांना कर्ज दिले असा कुणाचा रूपया सोडा चहा जरी पिला असेल तर राजकारण सोडेल. डॉ. अशोकराव खरात यांनी सॉफ्ट लोनची चांगली संकल्पना पुढे आणली परंतू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मार्गी लागू शकले नाही. अजित पवार महायुतीत गेले तेव्हा अजित पवारांना सांगितले की, जिल्हा बँक जिवंत ठेवत असाल तर तेव्हाच मी तुमच्या सोबत येईल. शरद पवारांविषयी आज ही आदर आहे. त्यांचे स्थान नेहमीसाठीच मनात राहिल. आर्थिक संस्थांना शिस्त महत्वाची असते. बँकेला आता पैसे मिळाल्यानंतर सर्वांची भाषा बदली. जेल मध्ये टाकण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. परंतू माझा उद्देश प्रमाणीक होता. यावेळी डॉ. खरात आणि त्यांच्या टीमचे कौतूक केले. प्रास्ताविक डॉ. अशोक खरात यांनी केले. जिल्हा बँकेचे मुख्य तांत्रिक अधिकारी सोमू इथापे यांनी संचलन तर आभार प्रदर्शन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चव्हाण यांनी केले. यावेळी ना. प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आ.डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय रायमूलकर, विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा केंद्रिय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी अशोकराव खरात यांच्यासह बँकेचे कर्मचारी तसेच सहाकर क्षेत्रातील कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत