बुलढाणा, १६ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२४ रोजी मतदारसंघातील हजारोच्या संख्येने माता-भगिनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी बुलढाणा येथे आलेले होते. युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अविस्मरणीय, आगळावेगळा सोहळा म्हणून साजरा झाला. युवानेते मृत्युंजय गायकवाड यांचे सारथी शंकर शेळके यांनी स्वतःच्या रक्ताने रेखाटलेली प्रतिमा वाढदिवसाच्या निमित्याने दिली भेट. जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अभंग पुनर्वसन संस्था येथे मूकबधिर अपंग विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात आले. दिव्य-सेवाप्रकल्प तसेच सेवासंकल्प येथे निराधार निराश्रीत लोकांना भोजन वाटप करण्यात आले. शहरातील कारंजा चौक येथे दुर्गामाता मंदिरामध्ये भव्य महाआरती युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते संपन्न झाली.





Total Users : 1356469