spot_img

महिला कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बुलढाणा, 25 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :- वनस्टॉप सेंटरमध्ये महिला समुपदेशकास मारहाण बुलढाणा : येथील वनस्टॉप सेंटरमध्ये अनैतिक देह व्यापार प्रकरणाच्या आरोपात ठेवण्यात आलेल्या एका महिलेने महिला समुपदेशकासह मारहाण केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी महिला समुपदेशकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक तथा अन्य कारणामुळे हिंसेमध्ये पीडित झालेल्या महिलांसाठी सखी वनस्टॉप सेंटर आहे. येथे महिलांना समुपदेशनाचीही सेवा पुरविल्या जातात. या सेंटरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अनैतिक देह व्यापार प्रकरणातील चार महिलांना ठेवण्यात आले होते. २४ डिसेंबर रोजी सकाळी कर्तव्यावर आलेल्या महिला समुपदेशकावर त्यातील एकीने महिलेने अचानक हल्ला करून रूमची चावी मागितली. समुपदेशक महिलेस या महिलेने गंभीर मारहाण केली. प्रकरणी पोलिसानी गुन्हा दाखल केला
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत