spot_img

विधानसभा निवडणुकांमध्ये पोलिसी कारवाईचा “संग्राम” !

◾ कोणत्या पोलिस अधिकाऱ्याचा केला एसपी यांनी सत्कार?

बुलढाणा, 27 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : प्रजासत्ताक दिनी ठाणेदार संग्राम पाटील, यांचा पोलीस अधीक्षकांकडुन गौरव करण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 23- चिखली विधानसभा मतदार संघाचे पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, ठाणेदार पो. स्टे. चिखली यांचेकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. विधानसभा निवडणूक निःपक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अवाधित ठेवण्यासाठी ठाणेदार संग्राम पाटील यांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन सदर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पो. स्टे. चे सहकारी अधिकारी अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार केले. सदर पथकांनी आदर्श आचार संहीता कालावधीत विविध ठिकाणांवरुन मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने बाळगलेली एकुण 77 लाख 56 हजार 479 एवढी रक्कम जप्त केली. याशिवाय अवैध दारु विक्रीच्या 105 ठिकाणी छापे मारुन लाखो रुपयांचा गावठी, देशी विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला तसेच आदर्श आचारसंहीता कालावधीत अवैध हत्यार बाळगणाऱ्या विरुध्द देखील कारवाई केली आहे.

एकंदरीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 23 चिखली विधानसभा मतदार संघात चिखली पोलीस स्टेशनने उल्लेखनिय कामगीरी करुन आदर्श आचार संहीतेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्याबद्दल तसेच निवडणूका शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडल्याने जनमानसात पोलीस विभागाची प्रतिमा उंचावल्याबद्दल पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचेकडुन प्रजासत्ताक दिनी ठाणेदार संग्राम पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत