बुलढाणा, 31 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत महाराष्ट्र शासन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने उद्या 1 फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात सहकार दिंडी आयोजित करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने सन 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषीत करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन व राज्यसहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 31 जानेवारी शुक्रवार सायंकाळी 6.00 वाजता साई लॉन्स येथे आराध्या मंगल कार्यालयाजवळ आगमन, संध्याकाळी 7 वाजता स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सहकारावरील पोवाडे, त्याचप्रमाणे सहकारातील महत्वाच्या विषयावर चर्चा सत्र राहणार आहे.
सहकार दिंडीचा मार्ग
दिनांक 1 फेब्रुवारी 2025 सकाळी 8.00 वाजता सहकार दिंडी साई लॉन्स येथून निघेल यामध्ये संस्थांची सर्व वाहने त्यामध्ये सर्व चार चाकी गाड्या, ओपन जीप, अॅम्बुलंस, चित्ररथ असलेली वाहने, तसेच दुचाकीवरील सर्व कर्मचारी, फेटे बांधून तसेच सहकाराचे झेंडे व स्कार्पसह हजर राहतील.
दिंडीचा मार्ग : सुरुवात साई लॉन्स ते चिखली रोड सुंदरखेड मार्गे राधेशामजी चांडक यांचे घरा-समोरून पुढे त्रिशरण चौक ते एडेड चौक जिल्हा सहकारी बँक चौक, कारंजा चौक, जनता चौक, बाजार लाईन, जयस्तंभ चौक, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संगम चौक येथे समारोप होईल तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, गजानन आमले सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बुलढाणा कर्मचारी वृंद सहकार विभाग बुलढाणा यांनी केले आहे.