spot_img

भाजपा ओबीसी मोर्चाला मिळणार बुलढाण्याचे बळ!

◾ विश्वनाथ माळी यांना राज्याचे उपाध्यक्ष पद बहाल

बुलढाणा, 2 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रवृत्त करणाऱ्या विश्वनाथ माळी यांचा परिचय सर्वांनाच आहे. राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेसपासून करणारे विश्वनाथ माळी मागील काही वर्षांपासून भाजपामध्ये पक्षकार्य करत आहेत. त्यांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्व क्षमता लक्षात घेऊन भाजपाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गजानन गाते यांनी आज याबाबतची लिखीत घोषणा केली आहे. श्री माळी यांना भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची नियुक्ती देताना संजय गाते यांनी त्यांच्याप्रति विश्वास व्यक्त केला आहे की, ही जबाबदारी पार पाडत असताना आपण आपल्या संघटन कौशल्याने राज्यभरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे. ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ओबीसी भाजपा मध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिश्रम कराल, अशी अपेक्षा ही व्यक्त केली आहे. याबाबत विश्वनाथ माळी यांनी गुड इव्हिनिंग सिटीला आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, पक्षाने माझ्या कामाची दखल घेतल्याचा आनंद आहे. राज्यातील भाजप नेते, वरिष्ठ पदाधिकारी, जिल्ह्यातील भाजपाचे आमदार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे आणि माझे हितचिंतक यांना माझ्या निवडीचे श्रेय जाते. ओबीसी मोर्चा चे काम अधिक जोमाने आणि वेगाने पुढे घेऊन जाईल, असा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. श्री माळी यांच्या निवडीमुळे भाजपमधील ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत