अमरावती मध्ये झाले ऑपेरेशन
खळबळजनक त्या आईच्या पोटात बाळाच्या पोटात काय ?
बुलढाणा, 4 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ घटनेतील धक्कादायक धक्के थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमरावती येथे तज्ञ डॉक्टरांनी या नवजात अर्भकाचे ऑपरेशन केले असता त्याच्या पोटात एक नव्हे तर दोन दोन गोळे आढळून आले आहे. अर्थात सदर महिलेला जुळे नव्हे तर तीळ होण्याची प्रक्रिया सुरु होती, असे स्पष्ट होत आहे. या घटनेतील प्रत्येक अपडेट्स गुड इव्हिनिंग सिटी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. आईच्या पोटात बाळा आणि बाळाच्या पोटात बाळ ही पहिली ब्रेकिंग सुध्दा गुड इव्हिनिंग सिटीने दिली होती. त्यानंतर त्या महिलेच्या डिलिव्हरीची सुध्दा पहिली अपडेट गुड इव्हिनिंग सिटीने दिली होती. आता यामधील महत्वाची अपडेट सुध्दा आम्ही आपल्याला देत आहोत. ती म्हणजे नवजात बाळाच्या पोटातून दोन अर्भक काढण्यात आले आहे. त्या नवजात बाळावरची यशस्वी शस्त्रक्रिया अमरावती येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे झाली.
जवळपास 5 लाखांमधून अशी एक घटना घडत असते. या घटनेला ‘फीट्स इन फिटू’ असे म्हटले जाते. बुुलढाण्याच्या इतिहासातील ही पहिली घटना असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे घाटाखालील एका महिलेच्या बाबतीत ही घटना 26 जानेवारी रोजी समोर आली. त्यानंतर 1 फेब्रुवारीच्या रात्री त्या महिलेची डिलीव्हरी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलढाणा येथे चार ते पाच तज्ञ डॉक्टरानी सुरक्षीतरीत्या केली. त्या महिलेला मुलगा झाला होता. त्या नवजात मुलाला पुढील उपचारासाठी शासकीय रूग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले होते.
त्या बाळावर अमरावती येथे तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाळाच्या पोटात दोन गर्भ होते. ते दोन्ही गर्भ डॉक्टरांनी सुरक्षीतरित्या काढले आहेत. त्या नवजात बालकावर अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे. त्या नवजात मुलाला 12 टाके पडलेले आहे. ही शस्त्रक्रिया अमरावतीच्या इतिहासातील पहिली घटना असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
बाळाची आई व बाळ ही सुरक्षीत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे.