spot_img

दिलेले उसणे पैसे मिळालेच नाही पण केला विनयभंग !

पलढगच्या तेजराव गायकवाडला एक वर्ष सश्रम कारावास

बुलढाणा, 28 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : हातउसणे पैसे परत करण्याच्या नावावर दादागिरी करून विनयभंग पिता-पुत्राला न्यायालयाने अद्दल घडविली आहे. पलढग गावच्या तेजराव सुपडा गायकवाडला एक वर्ष सश्रम कारावास तर या दुष्कृत्यात सोबत असणारा त्याचा मुलगा प्रेम याला दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए. खंडारे यांनी ठोठावली. सरकारी वकील श्रीमती छाया बावणे-अंभोरे आणि श्रीमती वैशाली कस्तुरे यांनी योग्य बाजू मांडून पिडीतेला न्याय मिळवून देण्यात भरीव कामगिरी केली, हे विशेष.  
27 फेबु्रवारी रोजी बुलढाणा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सरकार विरुद्ध तेजराव सुपडा गायकवाड (58) आणि त्याचा मुलगा प्रेम (24) पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण भादंवि कलम 354, 323, 504, 506,34 अंतर्गत दाखल गुन्ह्यात दोषारोप पत्र ठेवण्यात आलेले होते. घटना अशा प्रकारे आहे की, 12 जून 2020 रोजी तक्रारदारांनी आरोपींना उसणे पैसे मागितल्याच्या कारणावरून दिनांक 14 जून 2020 च्या दुपारी 2 वाजता तक्रारदार महिला (वय 39 वर्षे) व तिचा मुलगा आरोपींच्या शेतातील घरी गेले असता आरोपींनी तक्रारदार महिलेस लोटपाठ करून शिवीगाळ केली व विनयभंग केला. परत पैसे मागितले तर जीवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्टेशन बुलढाणा येथे दिनांक 14 जून 2020 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एएसआय रमेश बनसोडे यांनी तपास करून दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे 6 साक्षीदार यांची साक्ष नोंदवली व दोन्ही आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  श्रीमती पी ए खंडारे यांनी आरोपी तेजराव सुपडा गायकवाड यास भादवि कलम 354 अन्वये दोषी मानून एक वर्ष सश्रम कारावासाची व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंडन भरल्यास एक महिलना साध्या कारावासाची शिक्षा ठोठवली. सदर प्रकरणातील दोन्ही आरोपी तेजराव गायकवाड व प्रेम तेजराव गायकवाड यांना भादवी कलम 323 अन्वये दोषी मानून दोन महिने सश्रम करावास व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठविण्यात आली आहे. दंड न भरल्यास 15 दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा ठोठविण्यात आली आहे.
  सरकार पक्षातर्फे वकील श्रीमती छाया बावणे-अंभोरे व श्रीमती वैशाली कस्तुरे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली कोर्ट पैरवी म्हणून विलास बंगाळे यांनी काम पाहिले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत