spot_img

बुलढाण्यातील केस गळती…. अमित शहांचा थेट हिम्मतराव बावस्करांना फोन!

बुलढाणा, 3 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत) :
होय, बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती आता साधा मुद्दा राहिलेला नाही. कारण जिल्ह्यातील जवळपास 15 गावातील 350 पेक्षा अधिक महिला-पुरुष या समस्येने ग्रस्त आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः मुद्दा हाताळत असल्यामुळे केंद्र सरकार या प्रकरणाशी जोडल्या गेली आहे. परंतु आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही केसगळती मुद्द्याकडे लक्ष वेधल्या गेले. जर गृहमंत्री या प्रकरणाबाबत बोलत असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे का? असा प्रश्न गुड इव्हिनिंग सिटी वाचकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर पदरचे पैसे खर्च करून केस गळती संदर्भात जे संशोधन करीत आहेत, ते सर्वांना माहित आहे. विंचवावरील औषधाच्या संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत करण्यात आलेले डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी थेट पंजाब-हरियाणामधून आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचे मूळ शोधून काढले आहे. डॉक्टर बावस्कर यांचा दावा आहे की पंजाबमधून बुलढाणा जिल्ह्यात पोहोचलेल्या राशनच्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणावर सेलिनियममुळे केसगळती होत आहे. अर्थात त्यांचा हा दावा प्रसिद्धीपोटी असल्याचा टोला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी लगावला होता. त्यावर डॉक्टर बावस्कर यांनी नम्रपणे आरोपाचे खंडन करीत आपले आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी समर्पित असून माझा दावा खोटा असल्यास आयसीएमआर ने सत्य बाजू प्रकाशित करावी, असे आव्हान दिले. हा गदारोळ उडालेला असताना केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा डॉक्टर बावस्कर यांना फोन आल्याने कान टवकारणे साहजिकच आहे.

काय झाले अमित शहा आणि बावस्कर यांचे बोलणे?

असो, अमित शहा यांनी आज सकाळी 9 वाजता बावस्कर यांच्या 9422594794 या नंबर फोन केला यावेळी डॉक्टर बावस्कर यांनी केस गळतीचा मुद्दा छेडला हे खरंय परंतु शहांचा कॉल बावस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला होता. अमित शहा म्हणाले ” डॉक्टर साहब आपको जन्मदिन की शुभकामनाये… या शुभेच्छांचा स्वीकार करताना बावस्कर यांनी शहांना धन्यवाद म्हटले. पुढे जेव्हा शहा म्हणाले की, क्या चल रहा है‌ ?”, तेव्हा डॉ. बावस्कर म्हणाले “बुलढाणा में जो बाल झड़ने की समस्या हैं उस पर संशोधन चालू हैं”. यावर केंद्रीय मंत्र्यांनी, ” आपका अच्छा काम चल रहा हैं.. आपके कार्य के लिऐ बहुत सारी शुभकामना.”, या शब्दांत शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या मध्ये संवाद झाला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारतांना आपला मुद्दा “हिमतीने” केंद्रीय मंत्र्याच्या कानावर टाकण्याची हिम्मत डॉ. हिम्मतराव बावस्करच करू शकतात. अशा निग्रही आणि हिम्मतबाज डॉक्टरांना गुड इव्हिनिंग सिटी परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत