spot_img

कंगना मानत असेल, मी मोदींना देवाचा अवतार मानत नाही..

  • असे का म्हणाले केंद्रीय मंत्री रामदास आठवले

 

बुलढाणा, 8 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटीे) ः पक्षामधील प्रमुख नेत्यांचे लांगूलचालन नवीन प्रकार नाही. नेता, मंत्री यांच्या चप्पल हातात धरणे, वयाने छोटे असूनही त्यांना दंडवत घालणे किंवा त्यांना आई-वडीलांपेक्षाही मोठा दर्जा देणारे अनेक जण आहेत. अर्थात कुणासाठी हा श्रद्धेचा किंवा आदराचा भाग असू शकतो. हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेच्या खासदार तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावत यांनी आपल्या ताज्या विधानात नरेंद्र मोदींना देवाचा अवतार संबोधले आहे. पण भाजपसोबत सत्तेत असणारे केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले मोदींना देवाचा अवतार मानायला तयार नाहीत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, ‘मोदीजी देवाचा अवतार नाहीत.’. आज, बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. आठवले यांनी शासकीय विश्राम भवनावर पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांनी जेव्हा त्यांना खा. कंगना रणावत यांच्या मोदीजी देवाचा अवतार, या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, ‘मोदीजी देवाचा अवतार मी मानत नाही.. ते मानवाचा अवतार आहे. नरेंद्र मोदी हे अंत्यंत स्ट्राँग असणारे प्रधानमंत्री आहे. अन् आता एक सर्व्हे झाला होता जगातील सर्व अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा सर्व्हे झाला त्यामध्ये 80% लोकांनी पसंती दिली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून त्यांचं नाव आहे.. तसेच ते पंतप्रधान पंडीत नेहरूंचा विक्रम मोडतील, असे कौतुकोद्गारही ना. आठवले यांनी काढले. सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यांना संपूर्ण जगाने मान्यता दिली असल्याचेही केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत