spot_img

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज आमंत्रित

बुलढाणा, 26 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्या शासन निर्णयान्वये राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी  या चालू आर्थिक वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या साहित्यिक व कलावंतांनी https://mahakalasanman.org/pgeApplicationFromForUser.aspx या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरावा. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून दोन प्रतीमध्ये संपूर्ण प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह तालुका निहाय गट विकास अधिकारी, पंचायत समितीकडे दिनांक 31 जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा.या योजनेचे नियम व अटी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या क्रमांक दि. 2 जून 2025 पत्रामध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेले आहेत. अर्ज करताना अर्जदारांनी या नियम व अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. फक्त नियम व अटींची पूर्तता करणारे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेले अर्जच ग्राह्य धरले जातील. अपूर्ण व मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

जिल्ह्यातील सर्व पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत