spot_img

सार्वजनिक शिवजयंती २०२६ अनुषंगाने उद्या महत्वपूर्ण बैठक ….नवीन कार्यकारिणी निवडीसह तयारीवर चर्चा

बुलढाणा, २३ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ःछत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात भव्य-दिव्य शिवजयंती सोहळा १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा होत असतो. त्याच सोहळ्याच्या अनुषंगाने बुलढाण्यातील शिवप्रेमीच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजमाता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात करण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीत शिवजयंती २०२६ च्या अध्यक्ष व सचिवांची निवड होणार असून, कार्यक्रमासंदर्भात नियोजन केल्या जाणार आहे. तरी या बैठकीसाठी बुलढाणा शहरातील शिवप्रेमी अगदी वेळेवर उपस्थित राहावे, अशी विनंती अध्यक्ष/ सचिव/कोषाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा २०२५ यांच्यावतीने करण्यात आली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत