spot_img

“खेळाडूच या… बाकीचे कार्यालयातच थांबा !!”

सीईओ खरात यांनी का काढले फर्मान??

बुलढाणा, 4 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : आजपासून जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ही स्पर्धा आणि महोत्सव जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी एक मांदियाळीच ठरते. जे खेळाडू म्हणून सहभागी होतात, ते उत्साहीत असतातच परंतु या नौश्यांसोबत हौश्या-गौश्यांचीही जत्रा होते आणि पर्यायाने कार्यालये ओस पडतात. याकडे गुड इव्हिनिंग सिटीने कालच्या अंकात जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सिइओ गुलाबराव खरात यांनी लोकाभिमुख अधिकारी असल्याचा परिचय देत रात्रीच परिपत्रक काढले. या परिपत्रकाने स्पर्धा आणि महोत्सवामुळे कामाकाजावर होणाऱ्या विपरीत परिणामांना पायबंद बसण्यास मदत होणार आहे. यात श्री खरात यांनी स्पष्ट केले आहे की, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचेसाठी जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ ते ०६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आयोजीत करण्यात आलेले आहेत. सदरच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी / कर्मचारी यांनी विविध क्रिडा प्रकारात सहभाग घेतलेला आहे, क्रिडा स्पर्धेच्या कालावधीत जिल्हा स्तरावरील, पंचायत समिती स्तरावरील व क्षेत्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू यांनी दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६, दिनांक ०५ फेब्रुवारी व ०६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा स्तरावर उपस्थित रहावे, सहभागी खेळाडू अधिकारी कर्मचारी यांचे व्यतीरीक्त अन्य अधिकारी / कर्मचारी यांनी नियमित कार्यालयात उपस्थित रहावे जेणे करून कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या अभ्यांगत / नागरीकांची गैरसोय होणार नाही, याची सर्व कार्यालय प्रमुख व इतर अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

सदर परिपत्रकामुळे स्पर्धा-महोत्सवात केवळ एन्जॉयमेंटसाठी येणाऱ्यांना पायबंद बसणार आहे. गुड इव्हिनिंग सिटीने कालच्या बातमीत लक्ष वेधले होते की, स्पर्धा कामकाजाच्या दिवशी न ठेवता शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी ठेवल्या गेल्या असत्या तर कामकाजाविणा वायफळ जाणारा आठवडा वाचला असता. हे सत्य आहे की, शेवटच्या क्षणी स्पर्धेत बदल शक्य नाही. पण सिइओ खरात यांनी काल काढलेल्या परिपत्रकाकडे “डॅमेज कंट्रोल” म्हणून पाहायला हरकत नाही. ज्या संवेदनशीलतेने सिइओ खरात यांनी परिपत्रक काढले, तेवढ्याच गंभीरतेने या परिपत्रकाचे अंमलबजावणी झाली पाहिजे, ही गुड इव्हिनिंग सिटीची रास्ता पेक्षा आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत