spot_img

खळबळजनक ! अल्पवयीन तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला

 वर्षा घोती हत्याकांडाची पुनरावृत्ती?

बुलढाणा, 21 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : मोताळा परिसर पूर्णपणे हादरला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचा मृतदेह आढळला असून मृतदेहाच्या अवस्थेवरून तरुणीवर अत्याचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे सदर घटना ही जवळपास वीस वर्षांपूर्वी कुऱ्हा गोतमारा येथील वर्षा घोती हत्याकांडाची पुनरावृत्ती आहे का? असा प्रश्न समोर येत आहे. मृतक मुलीचे नाव गौरी शरद पुंड असे आहे. गिट्टी खदान परिसरातील नदीच्या पात्रात कोर्टाच्या बिल्डिंगच्या मागे गौरीचा मृतदेह आढळला. विवस्त्र अवस्थेतील हा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली असून फॉरेन्सिकची टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत