कोणत्या गटाचा होणार शहराध्यक्ष ? शिंदे की गोडे ?

बुलढाणा, २६ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे): शहर भाजप मधील अंतर्गत वाद हा काही नवा नाही. शहराध्यक्ष पदासाठी नेहमीच कुरघोडीचं राजकारण बघायला मिळते. माजी आमदार विजयराज शिंदे व बुलढाणा भाजपा विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे यांच्यात नेहमीच शीतयुध्द रंगत असतं. भाजपच्या शहराध्यक्ष पदावरून सिध्दार्थ शर्मा यांना काढल्यापासून गोडे गटात शहराध्यक्ष पदावर अनंता शिंदे यांच्या निवडी नंतर अंतर्गत वाद सुरू झाला होता. त्यांच्याकडूनच वेळोवेळी अनंता शिंदे यांच्या तक्रारीचा पाढा हा पक्षनेतृत्वाकडे वाचला गेला. त्यांना तीन महिन्यातच पदावूरन दुर करण्यात आले. दोन तीन दिवसांनी शहराध्यक्ष पदाची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे अनंता शिंदे यांच्याकडे ३० नोव्हेंबर रोजी शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली. ते ही धुरा सांभळत असतांनाच भाजपच्या महिला पदाधिकारी विजयाताई राठी यांच्याशी त्यांची बाचाबाची झाल्याचे समजते. यासंदर्भातील तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे पक्षातीलच काही मंडळीनी पोहोचविल्या. ६ मार्च रोजी पक्षाने त्यांना शहराध्यक्ष पदावरून काढले. ते तीन महिने ६ दिवसच पदावर राहू शकले. यावेळी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तर निवड झाली त्याचवेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप तेंव्हाच करण्यात आला होता. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या ‘जवळचा कार्यकर्ता’ या एकमेव निकषाच्या आधारावर अनंता शिंदे यांची नियुक्ती केल्याचा आरोप ही भाजपचे पदाधिकारी करीत होते. शहराध्यक्ष झाल्यानंतर अनंता शिंदे यांना शहर कार्यकारिणीची घोषणा देखील करता आली नव्हती. दोन दिवसापूर्वी शहराध्यक्ष पदासाठी भाजप जिल्हाध्यक्ष गणेश मांटे व माजी आमदार चैनसुख संचेती यांनी मुलाखती घेतल्या या मुलाखतीसाठी २५ पेक्षाही अधिक जणांनी मुलाखत दिली आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या संघाटनात्मक बैठकीला बोटावर मोजण्याइतकेच पदाधिकारी हजर असतात. मात्र पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी बघायला मिळते असा रोष काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यात्रेत जसे आपणांस ‘हौशे-गौशे-नवसे’ दिसतात, तसेच मुल- शहरापात्या गावाचा होणार ? ाखतीसाठी दिसले. हौस म्हणून मुलाखत देणारे, खऱ्या अर्थाने भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुलाखत देणारे आणि पात्रता नसतांना उगाचच मुलाखत देणारे, असे तीन प्रकारचे लोक मुलाखतीसाठी सहभागी झाले होते. शहराध्यक्ष पदासाठी आशिष व्यवहारे, अरविंद होंडे, मंदार बाहेकर, सोनु बाहेकर, नितीन बेंडवाल इत्यार्दीच्या नावाची चर्चा आहे. पण शहराध्यक्ष शिंदे की गोडे गटाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण शहराध्यक्ष झाल्यानंतर त्याला काम करू दिले जाईल की नाही? ही चिंतेची बाब आहे. शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ पक्ष म्हणून नावलौकिक असलेल्या भाजपात काही दिवसांपासून वरपासून खालपर्यंत स्वार्थी आणि संधीसाधू लोकांचा शिरकाव झाला आहे. शहर भाजपात गटातटाचे राजकारण आहे. एक गट दुसऱ्या गटाच्या नेत्याचा फोटो बॅनरवर न लावणे असो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्या नेत्याला निमंत्रण देण्याच टाळणे हा प्रकार समोर येत असतो. कारण शहराध्यक्ष पद मिळविण्यासाठी कोणी तरी गॉडफादर लागतोच हे काही निवडी वरून समोर आले आहे. त्यामुळे आपल्या नेत्याला खुष करण्यासाठी कुणाला तरी दुखवावंच लागत. दुखावल्या नंतर त्यातून आरोप प्रत्यारोपाचं राजकरण पुढं येतं.