spot_img

सम्राट अशोक जयंतीनिमित्त बुलढाण्यात सत्यपाल महाराज यांचा भव्य जाहीर कीर्तनाचे आयोजन

बहुजन समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.24 मार्च ( गुड इव्हीनींग सिटी ) : शहरात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त भव्य जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी बहुजन बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
      ऐतिहासिक मौर्य साम्राज्याचे महान शासक सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने मंगळवार, २४ मार्च  रोजी सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.
        सम्राट अशोक यांचे साम्राज्य हिमालयापासून दक्षिणेकडील कांचीपुरम-पुदुच्चेरीपर्यंत, तसेच अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सिंध, गुजरात ते बंगालमधील ताम्रलिप्त (तमलूक) पर्यंत विस्तारलेले होते. प्रजाहितदक्ष आणि धर्मनिष्ठ राज्यकारभारासाठी ओळखले जाणारे सम्राट अशोक यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी मानले जातात.
      या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे राहणार आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून भन्ते डॉ. धम्मदीप महाथेरो, तसेच आ. धिरज लिंगाडे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, रविकांत तुपकर, डॉ. सुकेश झंवर, जयश्री शेळके, दादासाहेब काटकर यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आयोजकांच्या वतीने सर्व नागरिक, विशेषतः बहुजन समाजातील बांधवांनी या प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रमास उपस्थित राहून सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत