spot_img

दिशाभूल करू नका.. टंचाईवर उपाययोजना करा

वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव जिल्हा प्रशासनावर संतापले

बुलढाणा, २७ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः ईरान व अमेरिका यांच्या युद्धामध्ये जगासह आपल्या सम्पुर्ण देशाला सुद्धा या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहे. पेट्रोल व डिझेल हा सर्व जनतेचा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत.. जे सुरु आहेत, त्याठिकाणी दीड किलोमिटरपर्यंत रांगा लागत आहेत आणि तिथेही पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मर्यादा घालून दिलेल्या आहेत.. असे असतांनाही जर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुटवडा नसल्याचे आवाहन करीत असतील तर ही स्पष्टपणे जनतेची दिशाभूल असल्याचा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केला आहे. जिल्हाभरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पेट्रोल पंप बंद आहेत, हे जिल्हाधिकार्‍यांना दिसत नाही का ? ते खोटे का बोलत आहेत? असाही सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे श्री जाधव म्हणतात की, जिल्हाधिकारी साहेब आपणास आवाहन करतो की आपण जिल्ह्यातील जनतेला सत्यता सांगा.. जेणकरून जनतेचा उद्रेक नाही तसेच आपण या बाबत आवश्यक कार्यवाही करून पेट्रोल व डिझेलची उपलब्धता सुनिश्‍चित जिल्हाधिकारी महोदयांनी करावी.

धर्मद्वेषींना निलेश जाधव यांचा टोला
जे सनातनी हिंदू म्हणून सोशल मीडिया वर रील तयार करून किंवा पोस्टद्वारे आवाहन करतात आणि म्हणतात की, मुस्लीम बांधवांनकडुन कुठल्याही वस्तुंची खरेदी करु नये, त्यांना सुद्धा आवाहन करतोय की, आपल्या देशामध्ये येणारे पेट्रोल,डिझेल व ड्रायङ्गुट हे मुस्लिम देशांमधूनच आपल्या देशात येते. त्यामुळे त्यांनी पेट्रोल, डिझेल किंवा ड्रायफूटवर बहिष्कार टाकावा, यातील काहीच घेवून नये, असा टोला जाधव यांनी लगावला आहे. पेट्रोल डिझेल घेत असाल तर सोशल मीडियाच्या माध्यमातुन विनाकारण हिंदु,मुस्लिम वाद होतील, असे व्हीडीओ वा रिल टाकणेे बंद करुन हिंदू धर्माला बदनाम करणे बंद करावे, असे आवाहन सुध्दा वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी धर्मद्वेषींना केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत