spot_img

सरंबा-धोत्रा शिवारात गांजाची लागवड : ४४ लाखांचा गांज जप्त

देऊळगाव राजा, 30 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी): तालुक्यातील सरंबा-धोत्रा शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ४४ लाख ५० हजार रुपये किमतीचा अफूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी शेतकरी संजय तुकाराम चेके याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार गट क्रमांक ३३८ मध्ये अफूची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानुसार ३० मार्च रोजी संयुक्त पथकाने सापळा रचून धाड टाकली. यावेळी शेतात अफूची झाडे आणि बोंडे मोठ्या प्रमाणात आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी १ क्विंटल ११ किलो वजनाचा अफूचा साठा जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४४ लाख ५० हजार रुपये आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
सदरची कारवाई देऊळगाव राजाचे नायब तहसीलदार साहिल जाधव, कृषी अधिकारी, महसूल अधिकारी एम. के. सोनवणे, आणि ग्राम महसूल अधिकारी सुरेश शेळके यांची उपस्थिती होती. तसेच, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, एलसीबीचे पीएसआय प्रताप बाजड, दिगंबर कपाटे, पुरुषोत्तम आघाव, वनिता शिंगणे, मनोज खारडे, पूजा सावळे, सतीश नाटेकर, समाधान टेकाळे, दुय्यम ठाणेदार दिनेश घुगे, सिद्धार्थ सोनकांबळे, मारुती कांयदे आणि पंढरी नेमाने या पथकाने केली आहे. दरम्यान, देऊळगाव राजा आणि चिखली तालुक्याच्या सीमावर्ती भागात अमली पदार्थांची बेकायदेशीर शेती वाढत असल्याचे समोर येत असून, पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत