spot_img

दुश्मन का दुश्मन अपना दोस्त

बुलढाणा, 3 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : दुश्मन का दुश्मन अपना दोस्त हे नेहमीच चर्चेत असलेला डायलॉग आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीत जाऊन थेट आव्हान देणे एवढे सोपे काम नाही. पण आव्हान देणाऱ्यात राज्यात ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा आमदार संजय गायकवाड यांनी आमदार श्वेता महाले यांच्या समोर नविन आव्हान निर्माण केले आहे. भाजप आणि शिवसेना हे एकमेकांचे नैसर्गिक मित्र पण बुलढाण्यात मात्र याच्या विपरीत घडताना दिसत आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे कट्टर समर्थक आणि उदयनगरचे सरपंच मनोज लाहूडकर यांना काही दिवसांपूर्वी आ. गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्याच कार्यक्रमात पुन्हा आ.गायकवाड आणि आ. महाले यांच्यातील वादाला थिणगी पडली. काल आमदार संजय गायकवाड, बुलढाणा नगर पालिकेचे नगराध्यक्ष पुजाताई गायकवाड, नगर पालिकेचे गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शेकडो शिवसैनिकांसह ते चिखलीच्या रेणुकामातेच्या दर्शनाला गेले होते. त्याच दरम्यान त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ५ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या एक दिवस आधी दोघांमध्ये भेट होणे हे मागे काही तरी शिजत तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून आपली भूमिका मांडताना सांगितले होते की, काँग्रेस पक्षातच राहणार आहे. भाजपच्या पक्ष कार्यालयातून शिवसेना पक्षप्रवेशाच्या पुढ्या सोडल्या जात आहे. याच दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी बोंद्रे यांची भेट घेऊन एकप्रकारे आ. महाले यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याचे कारण म्हणजे आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यात आता भर पडली आहे ती आ. गायकवाड यांची कारण गेल्या काही दिवसांपासून आ. महाले आणि आ.गायकवाड यांच्यात वैर निर्माण झाले आहे. त्यामुळे हीच संधी साधत दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणत त्यांनी राहुल बोंद्रे यांची भेट घेतली असावी.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत