spot_img

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी थेरड्यास एक वर्ष कारावास

५ हजारांचा दंडही ठोठावला

बुलढाणा, १२ मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः देऊळगांव घुबे येथील एका ६९ वर्षीय थेरड्याला अल्पवयीन मुलीच्या विनयभंग आणि छेडछाड प्रकरणी एक वर्ष सश्रम कारावास तसेच ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रथम अकबर शेख जाफर शेख यांनी दिलेल्या निर्णयामुळे आणि जिल्हा सरकारी वकील ऍड. वसंत एल. भटकर यांच्या युक्तीवादामुळे अपराधी रंगनाथ सखाराम घुबेला जेलची वारी घडली असून पिडीतेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
हकीकत अशा प्रकारे आहे की, १४ ऑक्टोबर २०२१ रोजी देउळगाव घुबे येथील पिडीता वय वर्ष १२ ही सकाळी ०८.३० वाजता घरी एकटी होती.  तिचे आई वडील शेतामध्ये गेलेले होते. ही संध साधून आरोपी रंगनाथ सखाराम घुबे (सध्या वय वर्ष ६९) रा. देउळगाव घुबे हा पिडीतेचे घरी आला व त्याने पिडीतेच्या घराच्या आत जावुन दरवाज्याची कडी लावुन घेतली. त्यावर पिडीतेने कडी का लावली असे विचारत असतानाच आरोपी तिचे जवळ आला.. तिचा हात पकडला व  विनयभंग केला. पिडीतेला उलट म्हणाला की, काहीही भिऊ नकोस.. गांगरलेल्या पिडीतेने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकुन आजी आली. नंतर आरोपीने दरवाजा उघडला व आजीने विचारपुस केली असता, खाली मान घालुन निघुन गेला. पिडीतेचे आई वडील शेतातुन परत आले असता, त्यांनी पोलीस स्टेशन अंढेरा येथे घडलेल्या घटनेबाबत तकार दिली.
त्यानंतर पोलीस स्टेशन अंढेरा यांनी तकार प्राप्त झाल्या नंतर पिडीतेचा व ईतर महत्वाचे साक्षीदाराचे जवाब नोंदविले, वैद्यकीय अधिकारी याच्यामार्फत पिडीतेची वैद्यकीय तपासणी केली व अहवाल प्राप्त केला. त्यानंतर लगेच आरोपीला अटक केली व त्याच दिवशी घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यांनतर पिडीतेचे जन्म प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले व सि. आर. पी.सी. चे कलम १६४ प्रमाणे प्रथम वर्ग न्यायालय, चिखली येथे तिचे बयान नोंदविण्यात आले व एकदरीत आरोपी विरूध्द घडलेल्या घटनेबाबत सबळ पुरावा मिळुन आल्याने आरोपी विरूध्द विशेष न्यायालय, बुलडाणा येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले व त्यानंतर आरोपी विरूध्द भा.द.वी. चे कलम ३५४-अ, ४५२, ३४३ व पोस्को ऍक्टचे कलम ८ व १२ विद्यमान न्यायालयात दोषारोप करण्यात आला. घटनेचा तपास पीएसआय मनोज वासाडे यांनी केला.
एकदरीत आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होण्याच्या दृष्टीतुन जिल्हा सरकारी वकील वसंत एल. भटकर यांनी एकुण ६ साक्षीदार तपासले त्यामध्ये पिडीता, तिचे वडिल व तिची आजी यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच घटनास्थळ पंच व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. ऍड. भटकर यांनी युक्तीवादही प्रभावी केला. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश १ बुलडाणा यांनी आरोपीस भा.द.वि. चे कलम ४५२ नुसार एक वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ०३ महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली व पिडीतेस आर्थिक सहाय्य मिळण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास कळविण्यात आले आहे. म.पो.हे.कॉ. माया सोनुने यांनी कोर्ट पैरवी म्हणून सहकार्य केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत