बुलढाणा, १४ मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : गुड इव्हिनिंग सिटीकडे सदर पोलिस कर्मचार्याचा चेहर्यासह पूर्ण फोटो आहे.. ज्या गाडीवर महाशय बसलेत, त्या गाडीचाही फोटो आहे.. परंतु आमची पत्रकारिता वैयक्तीक चारित्र्यहनन करणारी नाही तर आत्मचिंतन करायला भाग पाडणारी आहे. आमचे लेखन व्यक्तीद्वेष ठेवून नसते तर आमचा प्रवृत्तीला विरोध असतो, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने आम्ही अधोरेखीत करीत आहोत. सदर फोटो भर दुपारी ११.४५ वाजताचा आहे. बुलढाण्यातील मुख्य बाजार लाईन वर ड्यूटीवर तैनात असलेल्या या ट्रॅफिक हवालदाराने थ्थोडी उसंत पाहून सिगारेटचे काही झुरके मारले. लोकलाज म्हणून महाशय लपूनन-छपून आताच्या आड मोठ्या चातुर्याने शिट्टी आणि सिगारेट दोन्हीही तोंडात ठेवून आपला कार्यभाग साधत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे जिल्हा नशामुक्त होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. आणि त्यांच्याच विभागाचे कर्मचारी जर भर चौकात आणि ऑन ड्यूटी नशा करीत असतील तर कुणीही याला चुकीचेच म्हणेल की.. नव्या ठाणेदारांनी अशा पोलिसांच्या जुन्या सवयींकडेही लक्ष द्यावे आणि एसपी तांबे यांच्या तळमळीचा आदर करावा, अशी भावना व्यक्त होणे साहजीक आहे. या पोलिस कर्मचार्यावर कार्रवाई व्हावी, हा उद्देश्य नाही. परंतु या बातमीच्या माध्यमातून इतरांना शिस्त लागली आणि फोटोतील कर्मचार्याचे मन परीवर्तन होवून त्याने नशा सोडली तर आमच्या पत्रकारितेचे सार्थक होईल.



