spot_img

महाप्रसादाहून घरी परतणाऱ्या महिलेची सोन्याची चेन चोरली

बुलढाणा, 19 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : गणपतीचा भंडारा खाऊन घरी परत येत असतांना मागून भरधाव आलेल्या दोन मोटारसायकल स्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवली. येथील क्रीडा संकुल मार्गावर आज रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान घटना घडली. फरार झालेल्या दोन्ही आरोपी युवकांना पकडण्यासाठी शहर पोलीस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. येथील अष्टविनायक मध्ये राहणाऱ्या कैलास गिरी यांच्याकडे अकोला येथून महालक्ष्मी निमित्त पाहुणे आलेले आहेत. जवळच संत निरंकारी भवन मध्ये गणपती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर उज्वलाताई गिरी आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाल्या असताना पल्सर बाइक वर दोन जण भरधाव वेगाने आले आणि काही कळण्याच्या आत त्यांनी उज्वलाताईंच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडाओरडा केला परंतु श्री सुपर शॉपी च्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून आरोपी फरार झाले होते. इकडे नगरसेवक सचिन गायकवाड यांनी प्रसंगावधान राखीत तात्काळ पोलिसांना सदर माहिती कळवली. माहिती मिळताच बुलढाणा शहर ठाणेदार संग्रामसिंग पाटील आपल्या पथकासह वेगात घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना शोधण्यासाठी काही पोलीसही रवाना झालेत. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले असून आरोपी पकडण्याच्या दिशेने महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना हाती लागले आहेत. दरम्यान सदर घटनेनंतर मात्र संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून यापूर्वीही चैन स्नॅचिंगच्या दोन घटना ताज्या आहेत. श्री गिरी यांच्याकडून गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी हिसकावलेली चेन एक तोळ्याची होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत