spot_img

महाविकास आघाडीच्या उमेदवार 5 कोटीच्या आत

  • प्रा. नरेंद्र खेडेकर यांची एकुण संपत्ती 4 कोटी 47 लाख 40 हजार रुपये,

बुलढाणा4 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः महायुतीचे उमेदवार तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीपुढे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांची संपत्ती थुटकी असल्याचे आकडे सांगतात. आज, नरेंद्र खेडेकर यांनी उबाठा कडून आपले नामांकन दाखल केले आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला शपथपत्राद्वारे कळविले की, त्यांची चल आणि अचल संपत्ती मिळून एकुण 4 कोटी 47 लाख 40 हजार रुपये आहे. त्यापैकी त्यांच्या पत्नीच्या नांवावर 71 लाख 66 हजार रुपये आहेत. शेती आणि सेवानिवृत्तीमधून त्यांनी संपत्ती अर्जीत केली आहे. त्यांच्याकडे 55 हजार आणि अर्धांगिनी सौ. अर्चनाताई यांच्याकडे 48 हजार 500 रुपये आहेत. चिखलीच्या एसबीआय शाखेत खेडेकर यांचे 12 लाख 19 हजार 435 आणि 6 लाख 98 हजार 759 रुपये जमा आहेत. तर अशीच दोन खाती सौ. खेडेकर यांचीही आहेत. एकात 18 हजार 834 तर दूसर्‍या खात्यात 6 लाख 98 हजार 759 रुपये आहेत. मुदत ठेव म्हणून 1 कोटी रूपये दोघांनी एसबीआय चिखलीमध्ये ठेवलेले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याकडे 2021 मध्ये घेतलेली एक फॉर्च्यूनर (एमएच 28 बीके 9393) क्रमांकाची चार चाकी आहे. सौ. अर्चनाताईंकडे 24 लाख रुपयांचे दागिने आहेत, ज्यात सोन्याची रिंग, बांगडी आणि मंगळसूत्राचा समावेश आहे. खासदारकी लढविणार्‍या खेडेकर यांच्याकडे केवळ 1 एकर 15 गुंठे शेती आहे. शेलूदमध्ये प्लॉट, चिखलीमध्ये 800 स्न्वेअर फूट जमीन तसेच 7 हजार स्न्वेअर फूटचा प्लॉट आहे. याशिवाय 900 स्न्वेअर फूट जागा तसेच निवासी ईमारत, ज्यावर 6 हजार स्न्वेअर फूट बांधकाम आहे, जिचे मूल्य आजच्या बाजारभावानुसार एक कोटी रूपये आहे. अमरावतीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदविका धारण केलेले नरेंद्र खेडेकर 58 वर्षांचे आहेत. 2021 मध्ये कोरोना काळात त्यांनी पोस्टर जाळणे आणि घोषणा देणे बद्दल सथीचे रोग अधिनियम व आपत्ती व्ववस्थापन कलम 51 बी नुसार एकमात्र गुन्हा दाखल आहे. त्यांना कर्ज काढण्याची आवश्यकता पडलेली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत