spot_img

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट विजयराज शिंदे यांना फोन 

“अर्ज मागे घेण्याची केली विनंती 

“औकात” वाले विधान बेजबाबदारपणाचे 

बुलढाणा, 7 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत ) : भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होऊ शकते, याची खात्री पटल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून मागील 24 तासात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विजयराज शिंदे यांना मोबाईलवर संपर्क करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली असल्याचे गुड इव्हिनिंग सिटीला सूत्रांकडून कळाले. यावर विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा कॉल आला असल्याचा दुजोरा दिला. काय बोलणे झाले, हे विचारले असता ते म्हणाले की, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या औकात वाल्या विधानाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. ” विजयराज शिंदे यांना औकात दाखवून देऊ”, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे आता आम्हाला औकात दाखवल्याशिवाय पर्याय नाही, असे उत्तर यावेळी विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा विजयराज शिंदे यांनी उभे राहून दाखवावेच, असे आव्हान दिलेले आहे. “आपल्या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी मला आव्हान दिलेले असल्यामुळे मी अर्ज मागे कसा घेऊ??”, असे स्पष्टीकरण विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री यांना दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या नेत्यांची विधाने बेजबाबदारपणाची आणि चुकीची असल्याची कबुली देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाल्यानंतरच निर्णय घेऊ, असे विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले. विशेष म्हणजे आज सकाळी 11 वाजता मंत्री गिरीश महाजन बुलढाणा येथे विजयराज शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी सकाळीच नागपूरकडे रवाना झाल्यामुळे दोघांची भेट होऊ शकली नाही परंतु दोघांमध्ये अर्ज मागे घेण्याबाबत मोबाईलवर बोलणी झाली. नामदार महाजन यांनासुद्धा विजयराज शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या औकातवाल्या विधानाची आणि आमदार संजय गायकवाड यांच्या लढून दाखवीण्याच्या आव्हानाची माहिती दिली, हे महत्वाचे. आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी काल संध्याकाळी विजयराज शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा रेटा लावून धरला होता. एकंदरीत भाजपकडून विजयराज शिंदे यांना अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत