आज सकाळी खामगाव कडे जाणार्या एका टाटा एन्ट्रा गाडीने बोथा घाटात पेट घेतला. सातगाव म्हसला येथिल शिवाजी घोरपडे हे रंगाचे डबे घेऊन शेगावकडे जात असताना आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास केमिकलने भरलेली ही टाटा एन्ट्रा एमएच 28 बीबी 4297 क्रमांकाची गाडी देव्हारी फाट्याजवळ गाडी गतिरोधक वरून कुदल्याने स्पार्किंग झाली व गाडीत असलेल्या रंगाच्या डब्यांनी पेट घ्यायला सुरूवात केली. ड्रायव्हरच्या हे लक्षात आल्यानंतर तो गाडीच्या बाहेर पळाला आणि त्याने दोन्ही बाजूंनी येणार्या वाहनांना थांबवले. पुढच्या काही क्षणातच टाटा एन्ट्रा गाडीतून आगीचे लोळ उठले. वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यामुळे जीवित हानी टळली परंतु बराच वेळ या गाडीमधून काळा धूर संपूर्ण घाटात पसरला होता. केमिकलने भरलेली ही गाडी जळून खाक झाली आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा केला .





Total Users : 1353523