- बुलढाणा, 18 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : येथील सर्कुलर रोडवर फिरत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याची घटना आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. बाईकवर आलेल्या दोन जणांनी काही कळण्याच्या आतच सौ. दीपिका निलेश अग्रवाल यांच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला. दीपिका ताई सर्कुलर रोडवरील प्रकाश स्टोअर समोरून पायी जात होत्या. चिंचोले चौकाकडून धूम स्टाईलने आलेले हे दोघे चैन तोडून चिखली रोडने पळून गेले. माजी अध्यक्ष घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नाकाबंदी केली परंतु हाती काहीच लागले नाही. करण्यात आलेली चैन सोन्याची असून अडीच ते तीन तोळे तिचे वजन असल्याचे बोलले जाते.
◾◾◾





Total Users : 1372388