spot_img

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची आज बैठक

बुलढाणा, 26 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025 कार्यकारणी गठीत करण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती उत्सव दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात बुलढाणा शहरात साजरी करण्याकरीता व नुतन कार्यकारणीचे गठण करण्या संदर्भात बुधवार दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायं. ठिक 6.30 वाजता शासकिय विश्राम भवन बुलढाणा येथे मिटींगचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सदरच्या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. तरी बुलढाणा शहरातील शिव-फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत कार्य करणाऱ्या सर्व समाज बांधवांनी उपरोक्त बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन 133 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कासारे व सचिव विनोद इंगळे यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत