spot_img

अर्भक की, प्राण्याचे पिल्लू ? करवंडमध्ये आढळला मांसाचा गोळा

बुलढाणा, 11 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : आजची सकाळ करवंड आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना हादरवणारी ठरली. सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपकेंद्राचा परिसर झाडणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला समोरच मांसाचा गोळा आढळून आला. डोके, तीन नखे, एक हात, एक मोठा पाय, एक लहान पाय अशा स्वरूपात फिकट लाल रंगाचा हा मांसाचा गोळा पाहून अनेकांची भंबेरी उडाली. त्याठिकाणी उपस्थित नर्स सौ. मंदाताई लहाने यांनी सदर बाब आरोग्य सेविका श्रीमती रूपाली नेटके यांनी कळविली. आरोग्य सेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी दोघेही पळसखेड सपकाळ याठिकाणी आरोग्य शिबीर घेत होते. त्यांनी त्वरीत करवंड याठिकाणी धाव घेतली. उदयनगर येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वप्नील खंडागळे यांच्यासह वरिष्ठांपर्यंत सदर बाब कळविल्यानंतर अमडापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास एपीआय निर्मल यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. तोपर्यंत गावात ही बातमी पसरली होती. कुणी अंदाज व्यक्त केला की, निंबाच्या झाडाखाली हा गोळा आढळल्याने एखाद्या वानराचे पिल्लू असावे. गोळा पाहून नेमका अंदाज येत नसल्याने जो तो आपला कयास बांधत होता. पण जर स्त्री जातीचे भ्रूण असेल तर… या शंकेने मात्र अनेकांचे डोळे विस्फारलेले होते. गोळ्‌‍याची लांबी 12 ते 16 सेमी. आहे. मांसाचा गोळा बुलढाणा जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. तेथून हा मांसाचा गोळा अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲनाटॉमी विभागात पोहोचविण्यात आला आहे. याठिकाणी मांसाच्या गोळ्याचा अभ्यास होवून हा गोळा नेमका मानवी अर्भक आहे की, कुण्या प्राण्याचे मृत पिल्लू याबाबत तपासणी केली जाणार आहे. अमडापूर पोलिस सदर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे एपीआय श्री निर्मल यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत