spot_img

करवंड प्रकरणातील तपासणी अहवाल धक्कादायक !! ‘तो’ मांसाचा गोळा निघाले मानवी अर्भक 

 पोलिसांकडून तपास सुरु
बुलढाणा, 22 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : करवंड आरोग्य उपकेंद्रात सापडलेले ‘ते’ अर्भक मानवी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्यातून, अनैतिक संबधातून, अवैध गर्भपाताची याला किनार तर नाही ना ? अशी शक्यता वर्तवली जात आहे. ते अर्भक करंवड गावातीलच आहे की ? तेथे कुणी आणून टाकले असे प्रश्‍न ही उपस्थित होत आहे. करवंड आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर आणि कर्मचारी यांना हादरवणारी एक घटना 11 जूनच्या सकाळी 9 वाजता घडली होती. डोके, तीन नखे, एक हात, एक मोठा पाय, एक लहान पाय अशा स्वरूपात फिकट लाल रंगाचा मासाचा गोळा असलेलं अर्भक सापडले होते. त्यानंतर करवंड परिसरात एकच खळबळ उडाली होती. तो गोळा बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालय येथे पाठविण्यात आला होता. तेथून पुढील तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे अ‍ॅनाटॉमी विभागात पाठविण्यात आला होता. या अर्भकाच्या तपासणी नंतर अकरा दिवसांनी तपासणी अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये हा गोळा मानवी अर्भकाचा असल्याचे समोर आल्याने स्त्रीभ्रूणहत्यातून, अनैतिक संबधातून, अवैध गर्भपाताची याला किनार तर नाही ना ? अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे अर्भक स्त्री किंवा पुरूषाचे आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. जर हे स्त्री जातीचे अर्भक असल्यास त्यामधील स्त्रीभ्रूणहत्या ही शक्यता नाकरता येत नाही. आता पोलिसांसमोर पुढील तपासणीचा मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यांना विविध अँगल ने तपास करावा लागणार आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत