बुलढाणा, 3 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या क्रेटा गाडीला आग लागली. वानखेडे लेआउट निवासी टिकमसेठ वाधवानी यांचे सुपुत्र कुशल वाधवानी यांची ही गाडी क्रमांक एमएच 28 बीके 7271 होती. आग लागली की लावली, यासंदर्भात निश्चित सांगता येणार नाही, परंतु या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. आगीची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविली. परंतु काही मिनिटातच गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली होती. वाधवानी परिवार हा सर्वांशी स्नेह आणि प्रेम ठेवून असल्यामुळे कुणी आग लावली असेल, याविषयी शक्यता कमी असल्याचे अनेकांना वाटते. तर काहींनी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यापैकी कुणीतरी सिगारेट फेकली असावी आणि त्यामुळे आग लागली असावी, अशी शंका वर्तविण्यात येत आहे. शहर पोलिसांचे एक पथक फॉरेन्सिक टीम सह घटनास्थळावर असून कसून तपास केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चार वर्षांपूर्वी घेतलेल्या या वाहनाचा नियमित इन्शुरन्स आहे.



