spot_img

तानाजी नगरमध्ये विजय कल्याणरांना मारहाण

नगरसेवकपती चिंटू परसेंवर मारहाणीचा आरोप 

बुलढाणा, 24मे (गुड इव्हिनिंग सिटी) : चिंटू परसे आणि विजय कल्याणकर यांच्यात वाद होऊन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विजय कल्याणकर यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान दुध डेअरी जवळ मित्र ज्ञानेश्वर तळेकर यांचे सोबत बोलत असतांना नगरसेवकपती योगेश परसे तेथे आले व तु मला शिवीगाळ का केली असे म्हणुन चापटा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी आई गोदावरी कल्याणर, तसेच माझी पत्नी मनीषा कल्याणकर हया सोडवीण्यासाठी आल्या असता त्यांना देखील लोटपाट केली. शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच  जातीवाचक शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने चिंटू परसे यांच्यानी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विजय कल्याणकर हे प्रभागाच्या विकासकामांमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असता. ते आल्यानंतर धरपकड झाली पण छेडखानी केली नाही.
या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत