दारूच्या सवयीमुळे समाजात आणि मित्रांमध्ये बदनामी होत असल्याच्या रागातून सख्ख्या बहिणीचा गळा आवळून व चाकूने वार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपी भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विदर्भ हाऊसिंग सोसायटीमध्ये कोकीळाबाई जाधव राहतात. पतिसोबत पटत नसल्यामुळे त्या वेगळ्या राहत असल्याचे कळते. कोकीळाबाई दोन मुले आणि दोन मुली असा परिवार घेवून गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. मोठ्या मुलीला उबाळखेड येथे देण्यात आले. तर तिच्यापेक्षा छोटा भाऊ उबाळखेडमध्येच राहतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मुलगी म्हणजे अंकिता.. अंकिता कमी शिकलेली. तिचे लग्न ब्राह्मण समाजातील राकेश शर्मा सोबत करून देण्यात आले होते. त्याच्यापासून अंकिताला एक ६ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलगा आहे. कंपनीत नोकरीवर असलेल्या राकेशचे दोन महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून अंकिता आपल्या दोन्ही मुलांना घेवून विदर्भ हाऊसिंग
सोसायटीमध्ये आईकडे राहायला आली. मग हळुहळू सागरच्या टपोरीगिरीच्या तक्रारी अंकिता आईकडे करू लागली. ईकडे अंकिता बाहेर जॉब शोधण्यासाठी फिरत होती. तिचे फिरणेही सागरला आवडत नव्हते. दोघे एकमेकांवर आर-ोप-प्रत्यारोप करून भांडणे करीत होती. पंधरा दिवसांपूर्वी सा-गरने तिला कतरता चाकू मारला होता. पण तेव्हा अंकिताला जास्त लागले नाही. आईने भांडणे सोडविली होती. दोन दिवसांपूर्वी सागरचे आईसोबत वाद झाले आणि आई आपल्या मोठ्या मुलीकडे अंकिताच्या दोन्ही मुलांना घेवून निघून गेली. आता घरात सागर आणि अंकिता दोघेच बहिण भाऊ होते. मध्यरात्री त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडणे झालीत. १ वाजेच्या सुमारास त्यांच्यात बाथरूमध्येच हाणामारी सुरु झाली. सागरने तिच्या डोक्यात काही तरी अवजड वस्तू मारली. अर्धमेली झालेल्या अंकिता शर्माचा नंतर त्याने गळा आवळून खून केला. बहिणीची झटपट थांबली.. ती शांत झाली.. ती पूर्णपणे मेली आहे, हे खात्री केल्यावर सागर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. ‘मी माझ्या बहिणीचा खून केला आहे’, याची कबूली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली होती.
बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी दोषी ठरवून जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची ठोठावली आहे. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. तसेच, पीडितांच्या मुलांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने हे प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले आहे. सागर त्रंबक जाधव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे, तर अंकिता (वय २८ वर्ष) असे मृत बहिणीचे नाव आहे. घटना २८ जुलै २०२० रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास बुलडाणा येथील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथे घडली. मृत अंकिता हिला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे आपली समाजात व मित्रांमध्ये बदनामी होत असल्याचा राग आरोपी सागर याच्या मनात होता. खून करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच दिवशी संध्याकाळी आपली आई कोकिळा त्रंबक जाधव आणि अंकिताच्या मुलांना घराबाहेर काढून दिले होते. त्यामुळे आई कोकिळाबाई या नातवंडांना घेऊन बुलडाण्यातच राहणारी आपली दुसरी मुलगी मीरा उजेड हिच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या.
रात्रीच्या वेळी घरात कोणी नसताना आरोपी सागर याने अंकिताचा केबल वायरने गळा आवळला आणि चाकूने मारहाण करून तिचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने तिचा मृतदेह घराच्या बाथरूममध्ये लपवून ठेवला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जुलै २०२० रोजी सकाळी आरोपी सागर हा स्वतः बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी त्याने आपली आई कोकिळाबाई यांना फोन करून, “मी अंकिताचा केबल वायरने गळा आवळून खून केला आहे,” अशी माहिती दिली होती. आरोपीच्या कबुलीनंतर पोलीस स्टेशन बुलडाणा शहरच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे आधीच आई कोकिळा जाधव हजर होत्या. पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाचा व प्रेताचा मरणोत्तर पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने घटनास्थळावरून भौतिक पुरावे व केबल वायर जप्त केली.
त्यानंतर आई कोकिळा जाधव वय ५० यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीने दिलेल्या माहितीवरून कलम २७ नुसार गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्याचे कपडे जप्त करण्यात आले. तपास अधिकारी पी.एस.आय. अमित राजाराम जाधव यांनी विविध जप्ती पंचनामे करून, साक्षीदारांचे जबाब नोंदवून आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेचा (CAl) अहवाल प्राप्त करून न्यायालयात सबळ चार्जशीट दाखल केले.
न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी जिल्हा सरकारी वकील ॲड. व्ही.एल. भटकर यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीची आई कोकिळा जाधव यांची साक्ष, घटनास्थळावरील व जप्ती पंचनाम्यातील पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सावळे आणि तपास अधिकारी पी.एस.आय. अमित राजाराम जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.
सरकारी वकील भटकर यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी आरोपी सागर जाधव याला भा.द.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची सुनावली.
या प्रकरणाचा कौशल्याने तपास पी.एस.आय. अमित राजाराम जाधव यांनी केला, तर न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.