spot_img

बीड मध्ये भाविकांची बोट उलटून बुलढाण्याच्या दोन महिलांचा मृत्यू

बुलढाणा, 10 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : अधिक मास’ निमित्ताने बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यात असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. तीन वर्षांनंतर हा योग आल्यामुळे आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट गोदावरी पात्रात बुडाली.‌ या दुर्दैवी घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील रहिवासी प्रमिला शेषराव राठोड, कुंबेफळ कांताबाई ज्ञानोबा अंधाळे या दोन महिलांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बिबी गावावर शोककळा पसरली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बोटीच्या चालकाने बसवल्याने गोदावरी पात्रात काही अंतरावर जाताच बोट बुडाली. महिला, पुरुष यांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. अनेक महिला भाविकांनी देवाचा धावा केला. बोट बुडाल्याची दिसताच उपस्थित लोक, नागरीक आणि बचाव पथकाने तात्काळ गोदावरीत उड्या घेत लोकांना वाचवले. मात्र या दुर्दैवी घटनेत दोन भाविक महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरीक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य राबवत लोकांना गोदावरी नदीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आधीच नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आज बोल उलटण्याची घटना घडली. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम पुरी येथे प्रशासनाने मोठा खर्च करून येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. मात्र या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाचा हा दावा खोडून काढत भाविकांना कुठल्याच सुविधा नसल्याचा आरोप केला.

मात्र या दुर्दैवी अपघातात दोन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर पाच-ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी निवासी प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा.लोणार) आणि कुंबेफळ येथील कांताबाई अंधाळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर तिसरी महिला सिंधूबाई अर्जुन मावळे (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत