spot_img

एस.टी. बस स्थानकापासून २०० मीटर परिसर ‘नो पार्किंग झोन’

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात बुलढाणा जिल्ह्यात आरटीओ व पोलिसांची कारवाई

बुलढाणा (गुड इव्हिनिंग सिटी): बुलढाणा बसस्थानक परिसरात अधिकृत पार्किंग असताना सुध्दा नागरिक व खाजगी वाहतूक करणारे जिथे जागा दिसेल तेथे वाहन उभे करून देतात. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आता या सगळ्याला चाप बसणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात होणारी सातत्यपूर्ण घट गांभीर्याने घेत, प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतुकीचे कंबरडे मोडण्यासाठी संपूर्ण राज्यभर व्यापक मोहीम हाती घेतली आहे. एस.टी. बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील ‘नो पार्किंग झोन’ मधून अवैधरीत्या होणारी प्रवासी चढ-उतार रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंत्री तसेच राज्य परिवहन महामंडळामध्ये नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या विशेष बैठकीत तपासणीबाबत सख्त निर्देश देण्यात आले होते. या निर्देशांना अनुसरून, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व विभागांना अवैध वाहतुकीवर तत्काल व कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. बुलढाणा विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष सहकार्याने जिल्ह्यात ५ जून ते १५ जून या कालावधीत ही विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या संयुक्त मोहिमेअंतर्गत बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण ११७ वाहनांवर आतापर्यंत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बुलढाणा विभागांतर्गत येणाऱ्या खालील १४ प्रमुख बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग क्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने चोवीस तास गस्त व तपासणी केली जात आहे. बसस्थानकामध्ये बुलढाणा, धाड, चिखली, देऊळगाव राजा, अंदलापूर, मेहकर, लोणार.
सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, एस.टी. महामंडळाच्या आर्थिक नुकसानीस अवैध वाहतूक हाच मुख्य घटक आहे. मंत्री महोदय आणि मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या आदेशान्वये ही मोहीम यापुढेही अधिक सख्त स्वरूपात चालविली जाईल. कोणत्याही परिस्थितीत एस.टी. स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक खपवून घेतली जाणार नाही‌ असा इशारा जयंत कांडलकर सुरक्षा व दक्षता अधिकारी, बुलढाणा विभाग यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत