spot_img

खळबळजनक ! देऊळघाट येथे भावाचा भावावर खूनी हल्ला

बुलढाणा, 28 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः घरगुती कारणावरून सख्ख्या भावावर चाकू हल्ला झाल्याची घटना जवळच असलेल्या देऊळघाट येथे थोड्या वेळापूर्वी घडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी भावाला जिल्हा सामान्य रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. तर हल्ला करणारा भाऊ फरार झाला आहे. आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शेख मोईन (सलमान खान नावानेही ओळखतात) आणि त्याचा भाऊ मोहसीन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. हे भांडण मारहाणीपर्यंत पोहोचले. त्यातच शेख मोईनने मोहसीनला चाकू भोसकला. मानेवर, पाठीवर पाच ते सहा वार करून शेख मोहसीनला (वय 40) रक्तबंबाळ केल्यानंतर मोईन फरार झाला. इकडे नातेवाईक आणि इतरांनी जखमी मोहसिनला जिल्हा रूग्णालयात आणले. डॉक्टरांच्या टिमने तत्काळ उपचार सुरु केले आहेत. ठाणेदार गजानन कांबळे यांनी माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण देऊळघाटमध्ये दहशतव्याप्त असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. हल्लेखोर शेख मोईन हा स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवतो. त्याने गावातील कथित समस्यांबाबत सोशल मिडीयावर अनेकदा रान उठविलेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी गावातील गावगुंडांनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार त्याने पोलिसांत दिली होती. सदर परिवार हा देऊळघाटचा मूळ रहिवासी नाही. शेख बंधु हे मलकापूरचे रहिवासी आहेत. रोजगारनिमित्त काही दिवसांपासून सदर कुटुंब देऊळघाट मध्ये वास्तव्यासाठी आलेले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत